Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2025 मध्ये ‘या’ 10 नोकऱ्यांची मागणी वाढणार, पॅकेजही असेल दमदार, जाणून घ्या

Jobs in 2025: पुढील वर्षी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सायबर सिक्युरिटी सारख्या क्षेत्रात नोकऱ्यांची मागणी असेल. आता बीटेक करणारे विद्यार्थीही या शाखांमध्ये इंजिनीअरिंगची पदवी घेत आहेत. जाणून घ्या 2025 मध्ये कोणत्या नोकऱ्या लोकप्रिय होतील.

2025 मध्ये ‘या’ 10 नोकऱ्यांची मागणी वाढणार, पॅकेजही असेल दमदार, जाणून घ्या
Follow us
| Updated on: Jan 02, 2025 | 4:43 PM

Jobs in 2025 : पुढील वर्षी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सायबर सिक्युरिटी सारख्या क्षेत्रात नोकऱ्यांची मागणी असेल. आता बीटेक करणारे विद्यार्थीही या शाखांमध्ये इंजिनीअरिंगची पदवी घेत आहेत. जाणून घ्या 2025 मध्ये कोणत्या नोकऱ्या लोकप्रिय होतील.

गेल्या काही वर्षांत अनेक पारंपरिक नोकऱ्या लोप पावल्या असून त्यांच्या जागी नव्या नोकऱ्या आल्या आहेत. नोकरीचा ट्रेंड झपाट्याने बदलत आहे. पुढील वर्षीही हा ट्रेंड कायम राहणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटीसह अनेक क्षेत्रात तज्ज्ञांची मागणी वाढणार आहे. वर्ष 2025 मध्ये अनेक जुन्या नोकऱ्यांना किंमत राहणार नाही. त्यामुळे त्यात वेळ घालवू नका.

तंत्रबदलामुळे नोकरीचे क्षेत्रही बदलते. आता मनुष्यबळासह अनेक कामे एआय आणि मशिनने ताब्यात घेतली आहेत. बीटेकचे शिक्षण घेणारे विद्यार्थीही आता पारंपरिक शाखांऐवजी एआय आणि एमएल, सायबर सिक्युरिटी सारख्या शाखांना प्राधान्य देत आहेत.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अभ्यास आता शालेय स्तरापासूनच सुरू झाला आहे. जर तुम्ही 2025 मध्ये नवीन नोकरी शोधण्याचा किंवा पहिली नोकरी करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या कोणत्या क्षेत्रात पैशांचा वर्षाव होईल.

2025 मध्ये ‘या’ नोकऱ्यांची मागणी असणार?

  1. व्यवसायांना डेटावर आधारित निर्णयांची आवश्यकता समजत असल्याने डेटा शास्त्रज्ञांची मागणी वाढत आहे.
  2. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग इंजिनिअर्सची मागणी वाढत आहे कारण प्रत्येक कंपनी आणि व्यवसायाला आपल्या कामकाजात अपडेटेड तंत्रज्ञानाचा वापर करायचा असतो.
  3.  सायबर सुरक्षा तज्ज्ञ एखाद्या कंपनीला किंवा व्यवसायाला सायबर हल्ल्यांपासून डेटा सुरक्षित ठेवण्यास मदत करतात.
  4.  क्लाऊड कॉम्प्युटिंग प्रोफेशनल्स कंपनीचा डेटा आणि अ‍ॅप्लिकेशनक्लाउडवर ट्रान्सफर आणि स्टोअर करण्यात मदत करतात.
  5. डिजिटल मार्केटिंग एक्स्पर्टच्या मदतीने कंपन्या आपल्या प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेसची जाहिरात ऑनलाईन पद्धतीने करतात.
  6. आरोग्य सेवा क्षेत्र सदाहरित आहे. येथे नेहमीच व्यावसायिकांची मागणी असते. आरोग्य सेवेशी संबंधित पदविका, पदवी किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम करून तुम्ही त्यात करिअर करू शकता.
  7. गेल्या काही वर्षांत बिझनेस अ‍ॅनालिस्टची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच्या मदतीने कंपन्या आपल्या व्यवसायाचे आणि फायनान्सचे अधिक चांगल्या प्रकारे विश्लेषण करतात.
  8. पुढील वर्षीही मनुष्यबळ व्यावसायिकांच्या मागणीत घट होणार नाही. कंपन्यांचे काम व्यवस्थित सांभाळण्यासाठी त्यांची गरज असते.
  9. आजकाल हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग आणि शाश्वतता या सारख्या मुद्द्यांबद्दल खूप जागरूक झाले आहेत. या क्षेत्रातील तज्ज्ञांची मागणीही वाढत आहे.

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सने भरलेला आहे. त्यांना त्यांचे खाते आणि काम मॅनेज करण्यासाठी सोशल मीडिया मॅनेजरची आवश्यकता असते. पुढील वर्षीही या क्षेत्रात नोकऱ्यांची मागणी होणार आहे.

भेटायला जायला ते काय आयसीयूत गेले होते की कोमात? मनोज जरांगे संतापले
भेटायला जायला ते काय आयसीयूत गेले होते की कोमात? मनोज जरांगे संतापले.
संतोष देशमुख लढा आणि मुंडेंची तब्येत वेगळी...,' काय म्हणाले सुरेश धस
संतोष देशमुख लढा आणि मुंडेंची तब्येत वेगळी...,' काय म्हणाले सुरेश धस.
वाल्मिक कराडची बी टीम सक्रीय आहे..,' काय म्हणाले धनंजय देशमुख
वाल्मिक कराडची बी टीम सक्रीय आहे..,' काय म्हणाले धनंजय देशमुख.
आरबीआयने आणले या बँकेवर निर्बंध, मुलांचे लग्न, घराचे हप्ते सर्वच रखडले
आरबीआयने आणले या बँकेवर निर्बंध, मुलांचे लग्न, घराचे हप्ते सर्वच रखडले.
आता क्रिकेटमध्येही पदवीधर होता येणार... लवकरच कोर्स सुरू होणार
आता क्रिकेटमध्येही पदवीधर होता येणार... लवकरच कोर्स सुरू होणार.
मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय; सरकारला दिलासा की घाम फुटणार?
मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय; सरकारला दिलासा की घाम फुटणार?.
अजितदादांकडून मुंडेंची पाठराखण, दमानिया म्हणाल्या, यांना कोर्टातूनच...
अजितदादांकडून मुंडेंची पाठराखण, दमानिया म्हणाल्या, यांना कोर्टातूनच....
धनंजय मुंडेंवर कारवाई कधी ? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका
धनंजय मुंडेंवर कारवाई कधी ? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका.
आदित्य ठाकरे- पियुष गोयल यांच्यात रंगलं ट्विटर वॉर, काय आहे मुद्दा ?
आदित्य ठाकरे- पियुष गोयल यांच्यात रंगलं ट्विटर वॉर, काय आहे मुद्दा ?.
'इंडियाज गॉट लेटेंट’वादाप्रकरणी समय रैनाला दुसरा समन्स
'इंडियाज गॉट लेटेंट’वादाप्रकरणी समय रैनाला दुसरा समन्स.