UBI Recruitment 2021: युनियन बँकेत मोठी भरती, अर्ज करण्यासाठी आज शेवटची संधी?

Job | सहव्यवस्थापक पदासाठी MBA किंवा PGDBM किंवा अभियांत्रिकीची पदवी असणे गरजेचे आहे. तर व्यवस्थापक पदासाठी व्यापार किंवा तत्सम विषयातील पदवी आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला किमान तीन वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी सीए, सीएफए, सीएस किंवा एमबीएची पदवी असणे आवश्यक आहे.

UBI Recruitment 2021: युनियन बँकेत मोठी भरती, अर्ज करण्यासाठी आज शेवटची संधी?

UBI Recruitment 2021: बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. युनियन बँकेत अनेक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यामध्ये वरिष्ठ व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक अशा पदांचा समावेश आहे. एकूण 347 पदांसाठी भरती केली जाणार आहे. इच्छुकांनी unionbankofindia.co.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा.

भरती प्रक्रियेचे वेळापत्रक

ऑनलाईन अर्ज नोंदणी- 12 ऑगस्ट
अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 3 सप्टेंबर
अर्जात बदल करण्याची शेवटची तारीख- 3 सप्टेंबर
फॉर्म प्रिंट घेण्याची शेवटची तारीख- 18 सप्टेंबर
ऑनलाईन फी जमा करण्याची शेवटची तारीख- 12 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर

कोणत्या आणि किती पदांसाठी भरती

वरिष्ठ व्यवस्थापक (रिस्क)- 60
व्यवस्थापक (रिस्क)- 60
व्यवस्थापक (सिव्हिल इंजिनिअर)- 7
व्यवस्थापक (आर्क्टिटेक्ट)-7
व्यवस्थापक (इलेक्ट्रिकल इंजिनिअर)-2
व्यवस्थापक (प्रिटिंग टेक्नॉलॉजी)-1
व्यवस्थापक (फॉरेक्स)-50
व्यवस्थापक (सीए)-14
सहव्यवस्थापक (टेक्निकल ऑफिसर)-26
सहव्यवस्थापक (फॉरेक्स)-20

पात्रता

सहव्यवस्थापक पदासाठी MBA किंवा PGDBM किंवा अभियांत्रिकीची पदवी असणे गरजेचे आहे. तर व्यवस्थापक पदासाठी व्यापार किंवा तत्सम विषयातील पदवी आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला किमान तीन वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी सीए, सीएफए, सीएस किंवा एमबीएची पदवी असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला पाच वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.
व्यवस्थापक पदासाठी वयोमर्यादा 30 ते 40 इतकी आहे. तर व्यवस्थापक पदासाठी वयोमर्यादा 20 ते 30 इतकी आहे. सहव्यवस्थापक पदासाठी उमेदवाराचे वय 20 ते 30 वर्षे इतके असले पाहिजे. सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी नोंदणी शुल्क 850 रुपये इतके आहे. तर अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती आणि दिव्यांगांना नोंदणी शुल्क माफ आहे.

संबंधित बातम्या

Bank Jobs 2021: साऊथ इंडियन बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदावर भरती, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर

NABARD Admit Card 2021: नाबार्डकडून सहायक व्यवस्थापक आणि मॅनेजर परीक्षेचं प्रवेशपत्र जारी, डाऊनलोड कसं करायचं?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI