दोन मुलांनी केला आईच्या बॉयफ्रेंडचा खून, पोटातून आतडं काढून…
दोन तरूणांनी आपल्याच आईच्या बॉयफ्रेंडला क्रूरतेने संपवत त्याची हत्या केली. त्यांचा क्रूरपणा एवढ्यावरच थांबला नाही तर त्यांनी त्याच्या मृतदेहाचे तुकडे हवेत उधळले आणि ते फरार झाले. अथक तपास करत गुजरात पोलिसांनी त्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

गुजरातमधील गांधीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती ऐकून अंगावर अक्षरश: काटा येईल. तेथे भररस्त्यात दोन तरूणांनी एका इसमाची निर्घृणपणे हत्या केली. बेधडकपण आरोपींनी सर्वांसमोरच मृतदेहाचे तुकडे केले , एवढेच नव्हे तर ते तुकडे हवेत फेकून त्या दोघांनी पळ काढला. त्या दोन तरूणाच्या आईचं त्या (मृत) इसमाशी गेल्या 15 वर्षांपासून अफेअर होतं अशी माहिती समोर आली आहे. मात्र त्या दोन्ही मुलांना आईचं हे नातं मान्य नव्हतं, त्यांनी आईला अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तरीही तिने काहीच ऐकलं नाही.
त्यामुळे संतापलेल्या दोन्ही तरूणांनी मिळून आईच्या बॉयफ्रेंडचीच हत्या केली. त्या मुलांच्या वडीलांचा बऱ्याच वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. मात्र त्यानंतर आईच्या या नात्यामुळे वडिलांच्या स्मृतीचा अपमान होतोय, अशी त्या मुलांची धारणा होती. हे संपूर्ण प्रकरण गुजरातच्या गांधीनगरमधील मोखासन गावातील आहे. रतनजी ठाकूर असे मृत इसमाचे नाव आहे. ते व्यवसायाने गवंडी होते. त्याचे गावातील एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या कारणावरून त्या महिलेची मुले संजय आणि जयेश ठाकूर हे रतनजीवर चांगलेच चिडले होते.
त्या दोघांनी यापूर्वीही रतनजींना आईपासून दूर राहण्याची धमकी दिली होती, पण तरीही रतनजींसोबत आईचं प्रेमसंबंध सुरूच होते. या वादामुळे जातपंचायतीही बोलावण्यात आली, मात्र त्यातही तोडगा निघाला नव्हता असे पोलिसांनी सांगितले.
महिलेच्या मुलांनी केली हत्या
त्यानंतर दोन्ही भावांनी वैतागून रतनजीला मारण्याचा निर्णय घेतला. रतनजी आपल्या मित्रांसोबत गावात घर बांधत होते, तेव्हा दोन्ही भाऊ तिथे पोहोचले. त्याच्या हातात चाकू आणि रॉड होता. प्रथम एका भावाने रतनजी यांच्या डोक्यावर रॉडने वार करून त्यांना खाली पाडले. यानंतर दुसऱ्या भावाने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. दोघांनी मिळून आपल्या आईच्या प्रियकराची निर्घृण हत्या केली. दोन्ही भावांनी त्याच्या पोटात चाकूने अनेक वार केले. त्याचं आतडं बाहेर काढून हवेत फेकण्यात आलं आणि नंतर पोटातील अवयव चाकूने कापण्यात आले.
पोलिसांनी केली अटक
तेथे उपस्थित मजूरांनी त्या दोन्ही भावांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश मिळालं नाही, असं पोलिसांनी सांगितलं. गुन्हा केल्यानंतर दोघेही भाऊ हवेत चाकू फेकून तेथून फरार झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कसून तपास करत, त्यांचे मोबाईल लोकेशन ट्रॅक करून त्या दोघांना पकडलं. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
