AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan Job Fraud : नोकरीचे आमिष दाखवून तरुणाला 4 लाखाचा गंडा, महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कल्याण पश्चिम येथे राहणारे योगेश चेऊलकर यांनी नोकरीसाठी एका ठिकाणी अर्ज केला होता. त्यानंतर त्यांची ऑनलाईन पद्धतीने मुलाखत घेण्यात आली. यावेळी कॉग्नीजन्ट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स कंपनीतील तीन अधिकाऱ्यांनी त्यांचा इंटरव्ह्यू घेतला.

Kalyan Job Fraud : नोकरीचे आमिष दाखवून तरुणाला 4 लाखाचा गंडा, महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नोकरीचे आमिष दाखवून तरुणाला 4 लाखाचा गंडाImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Aug 10, 2022 | 10:12 PM
Share

कल्याण : कल्याणमध्ये एका बेरोजगार तरुणाला मोठ्या पदावरील नोकरीचे आमिष (Lure) दाखवून, कागदपत्र पडताळणीसाठी लिंक पाठवून त्याच्या खात्यातून चार लाख रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. महात्मा फुले पोलीस (Mahatma Phule Police) ठाण्याचा हद्दीत ही घटना घडली आहे. योगेश चेऊलकर असे फसवणूक (Fraud) झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महात्मा फुले पोलिसांनी विशाल शर्मा व कृष्णा रामराव या दोन आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करत तंत्रज्ञान खात्याकडे वर्ग करत तपास सुरू केला आहे.

आधी कागदपत्रं पडताळणीसाठी पैसे मागितले

कल्याण पश्चिम येथे राहणारे योगेश चेऊलकर यांनी नोकरीसाठी एका ठिकाणी अर्ज केला होता. त्यानंतर त्यांची ऑनलाईन पद्धतीने मुलाखत घेण्यात आली. यावेळी कॉग्नीजन्ट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स कंपनीतील तीन अधिकाऱ्यांनी त्यांचा इंटरव्ह्यू घेतला. हे तिन्ही पदाधिकारी बोगस असून त्यांनी सीनियर मॅनेजर पदावर निवड झाल्याचे सांगत नोंदणी प्रक्रियेसाठी साडेसहा हजार रुपये द्या असे सांगितले. योगेशने हे पैसे देताच पुन्हा कागदपत्र पडताळणीसाठी 18 हजार रुपये देण्यास सांगितले. हे पैसे देखील योगेश यांनी दिले. त्यानंतर योगेश यांना एक लिंक पाठवून दिली. तुमच्या कागदपत्रांची पुन्हा पडताळणी करायची आहे, त्यासाठी एक लिंक देतो ती लिंक उघडा असे सांगितले.

लिंकद्वारे बँक खात्यातील सर्व रक्कम वळती केली

योगेश यांनी लिंक उघडताच भामट्यांनी योगेश यांच्या एचडीएफसी बँक अंधेरी शाखा, कल्याणमधील संतोषी माता रोड शाखा आणि एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सात व्यवहार करुन योगेश यांच्या बँक खात्यामधून खोटी कारणे देऊन 4 लाख 9 हजार 694 रुपये परस्पर वळते केले. योगेश यांना हे लक्षात येताच त्यांनी भामट्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही. त्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात धाव घेतली. (4 lakhs extorted from a young man by luring him with a job in Kalyan)

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.