VIDEO | ख्रिसमस परेडमध्ये कार घुसली, पाच जणांचा चिरडून मृत्यू, 40 हून अधिक जखमी

अमेरिकेतील विस्कन्सिनमध्ये घडलेल्या या दुर्घटनेत किमान पाच जणांचा चिरडून मृत्यू झाला, तर 40 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संशयित कार चालकाला ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास सुरु आहे.

VIDEO | ख्रिसमस परेडमध्ये कार घुसली, पाच जणांचा चिरडून मृत्यू, 40 हून अधिक जखमी
कार दुर्घटनेची दृश्यं कॅमेरात कैद


विस्कन्सिन : अमेरिकेतील विस्कन्सिन (Wisconsin) स्टेटमध्ये नाताळच्या तोंडावर परेडचं (Christmas parade) आयोजन करण्यात आलं होतं. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात जल्लोष सुरु असतानाच एका कारने परेडमध्ये घुसून धडक दिल्यामुळे किमान पाच जणांचा चिरडून मृत्यू झाला, तर 40 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लाल रंगाची एसयूव्ही कार नागरिकांना चिरडत असतानाची दृश्यं कॅमेरामध्ये कैद झाली आहेत.

नेमकं काय घडलं?

ही घटना स्थानिक वेळेनुसार रविवार 21 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 4:30 वाजता (22.30 GMT) च्या सुमारास घडली. मिलवॉकी उपनगरातील वाउकेशा शहरातील प्रेक्षक या वार्षिक परेड सोहळ्यात सहभागी झाले होते. प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्ही फुटेजनुसार, एसयूव्ही कार शाळेच्या मार्चिंग बँडच्या मागून या परेडमध्ये घुसली.

पाहा व्हिडीओ :

40 हून अधिक जण जखमी

एकूण 11 प्रौढ आणि 12 लहान मुलांना विविध सहा रुग्णालयात नेण्यात आले, असे अग्निशमन प्रमुख स्टीव्हन हॉवर्ड यांनी पत्रकारांना सांगितले. किमान पाच जणांचा चिरडून मृत्यू झाला, तर 40 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संशयित कार चालकाला ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास सुरु आहे.

विस्कन्सिनचे गव्हर्नर टोनी एव्हर्स यांनी सांगितले की ते आणि त्यांची पत्नी या अपघातात जखमी अथवा बळी गेलेल्या सर्व मुले, कुटुंबे आणि इतर सदस्यांसाठी प्रार्थना करत आहेत.”

संबंधित बातम्या :

पोलिसांच्या तावडीतून मालकाने सोडवलं, वॉचमनचा बायकोसोबत त्याच्याच घरी 47 लाखांचा दरोडा

गोड बोलून तरुणाला जाळ्यात अडकवलं, मागितली एक लाखाची खंडणी, औरंगाबादध्ये हनी ट्रॅपची केस!

महिलेचा छतावरुन पडून मृत्यू झाल्याचा बनाव, चार वर्षांच्या मुलांनी सांगितलं बाबांनीच आईला ढकललं

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI