AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांची खचाखच गर्दी, गप्पांचा फड… अचानक टॉयलेटमध्ये सापडला 5 वर्षांच्या मुलाचा मृतदेह, प्रवाशी हादरलेच

मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवरून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरखपूरहून मुंबईला येणाऱ्या कुशीनगर एक्सप्रेस ट्रेनच्या टॉयलेटमधील कचऱ्याच्या डब्यात एका 5 वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला आहे.

धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांची खचाखच गर्दी, गप्पांचा फड... अचानक टॉयलेटमध्ये सापडला 5 वर्षांच्या मुलाचा मृतदेह, प्रवाशी हादरलेच
Train crime
| Updated on: Aug 23, 2025 | 5:44 PM
Share

रेल्वेचा प्रवास हा सर्वात सुरक्षित आणि सुखद मानला जातो. मात्र आता मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवरून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरखपूरहून मुंबईला येणाऱ्या कुशीनगर एक्सप्रेस ट्रेनच्या टॉयलेटमधील कचऱ्याच्या डब्यात एका 5 वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच RPG आणि GRP पथकाने घटनास्थळी धाव घेत या मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

समोर आलेल्या माहितीनुसार, या मुलाचा गळा चिरून खून करण्यात आल्याचा संशय आहे. या हत्येचा आरोप असलेला व्यक्ती मृताचा बालकाचा नातेवाईक ( मावसभाऊ) असल्याचे बोलले जात आहे. जीआरपी आणि आरपीएफ एकत्रितपणे या घटनेचा तपास करत आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण ट्रेनमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

एसी कोचमध्ये आढळला मृतदेह

आरपीएफने दिलेल्या माहितीनुसार, लोकमान्य टिळक टर्मिनस येथे कुशीनगर एक्सप्रेसचा एसी कोच बी2 च्या बाथरूममध्ये या मुलाचा मृतदेह आढळला आहे. आरोपीने हत्येनंतर कचऱ्याच्या डब्यात हा मृतदेह लपवला होता. काही प्रवाशांना काहीतरी संशयास्पद असल्याचे आढळळे त्यानंतर त्यांनी तात्काळ रेल्वे कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर आरपीएफ जवानांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

रेल्वेत लहान मुलाचा मृतदेह आढळल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिस आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती मिळताच कोचची कसून तपासणी केली. तसेच प्रवाशांनाही चौकशीसाठी थांबवण्यात आले होते. प्रवाशांकडून याबाबत अधिकची माहिती घेण्यात आले आहे. ही घटना अत्यंत गंभीर आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या पुराव्याकडे दुर्लक्ष केले जाणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

जीआरपीकडून तपासाला सुरुवात

जीआरपीने या घटनेच्या तपासाला सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मुलाचे अपहरण त्याच्याच मावसभावाने केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर त्याची हत्या केल्याचा संशय आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या दृष्टीने तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी अनेक लोकांची चौकशी सुरू केली असून पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.