Buldhana Crime | सततची नापिकी, कर्जामुळे त्रस्त; महिला शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला (Loan) कंटाळून 65 वर्षीय शेतकरी महिलेने विहिरीमध्ये उडी घेवून आत्महत्या (Suicide) केली. ही घटना काल 22जानेवारी रोजी सकाळी रामनगर येथे घडली.

Buldhana Crime | सततची नापिकी, कर्जामुळे त्रस्त; महिला शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
भयंकरच! प्रॉपर्टीसाठी आजीला कुत्र्यासमोर फेकले, माथेफिरू नातू मोकाट
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 12:47 PM

बुलडाणा : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला (Loan) कंटाळून 65 वर्षीय शेतकरी महिलेने विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केली. ही घटना काल 22 जानेवारी रोजी सकाळी रामनगर येथे घडली. महिलेने आत्महत्या केल्याचे समजल्यावर या घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी लगेच तलाठी, पोलीस ठाण्याला दिली होती. माहिती मिळताच पोलीस (Police) आणि महसूल प्रशासनाने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिसांनी या महिलेच्या आकस्मिक मृत्यूची नोंद केलीय.

महिलेने 50 हजार रुपयांचे घेतले होते पीककर्ज

मिळालेल्या माहितीनुसार बुलडाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रामनगर येथील यमुनाबाई तुकाराम मोढेकर वय 65 यांच्याकडे रामनगर शिवारात एक हेक्टर जमीन आहे. या जमिनीवर त्यांनी मेरा खुर्द येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे 50 हजार रुपये पीककर्ज घेतलेले आहे. शेतात उत्पन्न काढण्यासाठी महिलेचे सर्व कुंटुंब शेतातच वास्तव्यास आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे त्यांच्याकडून बँकेच्या घेतलेल्या पिककर्जाची परतफेड होऊ शकली नाही.

कोणालाही न सांगताच गेल्या अन् परतल्याच नाही 

कर्जाची परतफेड न झाल्यामुळे तसेच घरची परिस्थिती हलाखीची होत असल्यामुळे मृत महिलेने 21 जानेवरीच्या सायंकाळी जेवण केले. तसेच सर्वजण घरात झोपलेले असताना त्या घरात कोणालाही काहीही न सांगता शेतात गेल्या. मात्र पुन्हा त्या घरी परत आल्याच नाहीत घरच्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली असता महिला शेतकऱ्याने शेतातील विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी लगेच तलाठी, पोलिसांना दिली होती. त्यांच्या या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

इतर बातम्या :

Nashik Crime | दोन वेटरमध्ये वाद, नंतर तुंबळ हाणामारी, नाशकात हॉटेलमध्ये एकाचा मृत्यू

Gang rape| विधवा महिलेवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेने शिरूर हादरले; 6 जणांना अटक  

Cyber Crime | केवायसी अपडेटच्या नावाखाली फेक फोन कॉल्स, बँक खात्यातील रक्कम लाटणाऱ्यांना मुंबई पोलिसांकडून बेड्या

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.