Nashik Crime | दोन वेटरमध्ये वाद, नंतर तुंबळ हाणामारी, नाशकात हॉटेलमध्ये एकाचा मृत्यू

जिल्ह्यातील येवला तालुक्यात (Yeola Taluka) हादरवून टाकणारी घटना घडली आहे. येथे हॉटेलमधील वेटर्समध्ये तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत एकाचा चक्क मृत्यू (Murder) झालाय.

Nashik Crime | दोन वेटरमध्ये वाद, नंतर तुंबळ हाणामारी, नाशकात हॉटेलमध्ये एकाचा मृत्यू
CRIME
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 12:01 PM

नाशिक : जिल्ह्यातील येवला तालुक्यात (Yeola Taluka) हादरवून टाकणारी घटना घडली आहे. येथे हॉटेलमधील वेटर्समध्ये तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत एकाचा चक्क मृत्यू (Murder) झालाय. या धक्कादायक घटनेमुळे नाशिक जिल्हा (Nashik District) हादरला आहे. पोलिसांनी या प्रकरणात चार जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून तपास केला जात आहे.

वादाचे रुपांतर थेट हाणामारीत

मिळालेल्या माहितीनुसार येवला तालुक्यातील नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील अंदरसुल गावजवळ स्वामीज नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटर्समध्ये आपापसात वाद झाला होता. त्याचेच पर्यावसान थेट हाणामारीत झाले. वेटर्समध्ये सुरु झालेल्या या हाणामारीमध्ये एका चाळीस वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. मारहाणीमध्ये जखमी झाल्यामुळे या कामगाराला आपला जीव गमवावा लागलाय.

चार जणांना बेड्या ठोकल्या

या घटनेची माहिती होताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसे घटनास्थळाची पाहणी करुन पोलिसांनी जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी चारही आरोपींना आरोपींना अटक केलं आहे. तसेच कामगाराच्या मृत्यूचा पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत.

पतीने केली पत्नीची हत्या, नंतर गळफास घेण्याचा प्रयत्न 

दरम्यान, मुंबईमधील मालाड येथे घरगुती वादामुळे पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली. तसेच पत्नीच्या हत्येनंतर पतीनेदेखील गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. तानाजी कांबळ (30) आणि शीतल तानाजी कांबळे (25) अशी पती पत्नीची नावे आहेत. पती तानाजी कांबळेला उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक होती.

इतर बातम्या :

Cyber Crime | केवायसी अपडेटच्या नावाखाली फेक फोन कॉल्स, बँक खात्यातील रक्कम लाटणाऱ्यांना मुंबई पोलिसांकडून बेड्या

Pune Crime| पुण्यात अमलीपदार्थाची विक्री करताना नायजेरियन नागरिकाला अटक; इतक्या लाखांचे कोकेन जप्त

Nagpur Crime | अल्पवयीन प्रेमीयुगुल पळून गेले; नागपुरात दोघांचाही मृत्यू, नेमकं कारण काय?

Non Stop LIVE Update
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.