AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Swargate Rape Case : दत्ता गाडे तू बाहेर ये… तुला चारही बाजूने घेरलंय; किर्र अंधारात पोलिसांचं आवाहन अन्…

पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला 72 तासांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी विविध पथके तयार करून आणि ड्रोनचा वापर करून शोध मोहीम राबवली. गाडे याला शेतात लपलेला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

Swargate Rape Case : दत्ता गाडे तू बाहेर ये... तुला चारही बाजूने घेरलंय; किर्र अंधारात पोलिसांचं आवाहन अन्...
पोलिसांनी दत्ता गाडेला कसं पकडलं ? Image Credit source: TV9
| Updated on: Feb 28, 2025 | 12:38 PM
Share

पुण्याच्या स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर 72 तासानंतर पोलिसांनी अटक केली आहे. मध्यरात्रीच्या किर्रर अंधारात पोलिसांनी त्याला अटक केली. दत्ता गावातच असल्याची टिप मिळाली. तो शेताच्या दिशेने गेल्याचं पोलिसांना कळालं आणि पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. पोलिसांनी त्याला चारही बाजूने घेरल्याचं सांगितलं आणि शरणागती पत्करण्याचं आवाहन केलं. त्यानंतर गाडेनेही शरणागती पत्करली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आज त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे.

दत्ता गाडेचा काल दिवसभर पोलिसांनी शोध घेतला. पण तो सापडला नाही. शिरूर येथील गुनाट गावात तो आल्याचं पोलिसांना कळलं होतं. त्यामुळे पोलिसाांनी पोलिसांची 13 पथके तयार केली. त्याला पकडण्यासाठी 100 पोलीस गावात तैनात करण्यात आली होती. तसेच ड्रोनच्या सहाय्याने त्याचा शोधही घेतला जात होता. गावातील उसाच्या शेतात श्वान पथकाच्या सहाय्याने शोध घेतला. पण तो सापडला नाही. मात्र पोलिसांनी आपलं सर्च ऑपरेशन सुरूच ठेवलं.

त्याला सांगितलं बाहेर ये

रात्रीच्या अंधारात गाडे बाहेर येईल असा पोलिसांना अंदाज होता. त्यामुळे पोलिसांनी रात्रीही सर्च ऑपरेशन सुरू ठेवलं. यावेळी अचानक पोलिसांना एक फोन आला आणि गाडे नेमका कोणत्या परिसरात आहे याची माहिती मिळाली. रात्री 11.45 च्या दरम्यान भूक लागली म्हणून दत्ता गाडे एका घरात पाणी पिण्यासाठी गेला. त्या घरातील लोकांनी त्याला पाणी दिलं. पाणी प्यायल्यानंतर तो गेला. तो जाताच त्या घरातील लोकांनी पोलिसांना फोन केला. आणि दत्तात्रय येऊन गेल्याचं सांगितलं.

दोन तास ऑपरेशन

त्यानंतर अर्ध्या तासात पोलिसांनी चारही बाजूंनी नाकेबंदी केली. संपूर्ण उसाचं शेत घेतलं. ड्रोनच्या माध्यमातून त्याला बाहेर येण्याचं आवाहनही केलं. दत्ता गाडे, तू बाहेर ये, तुला चारही बाजूंनी घेरण्यात आलं आहे, असं आवाहन पोलिसांनी केलं. आपला ठावठिकाणा लागला. आता आपलं काही खरं नाही, असं लक्षात आल्यानंतर दत्तात्रय गाडे बाहेर आला. तो कॅनोलच्या खड्ड्यात लपून बसला होता. तो बाहेर आल्यावर पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतलं. एका महिलेने पोलिसांना कॉल केला होता. कॉल आल्यानंतर पोलिसांनी दोन तास सर्च ऑपरेशन केलं आणि त्याला ताब्यात घेतलं. रात्री ताब्यात घेतल्यानंतर त्याला लष्कर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे. सकाळी त्याच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. आता त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा