AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Swargate Crime : पोलीस असल्याचं सांगून मुलींशी ओळख वाढवायचा, आधीही त्याने… दत्ता गाडेचे गुन्हे उघड

पुण्यातील स्वारगेट बस स्टॅँड परिसरात सोमवारी पहाटे एक 26 वर्षांच्या तरूणीवर बसमध्ये बलात्कार करण्यात आला. आरोपी दत्ता गाडेने फसवून तिला बसमध्ये चढवलं आणि एकदा नव्हे तर दोनवेळा तिच्यावर अत्याचार केला आणि तो फरार झाला. पीडित तरूणीच्या तर्कारीनंतर हे प्रकरण उघडकीस आलं आणि संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली.

Swargate Crime : पोलीस असल्याचं सांगून मुलींशी ओळख वाढवायचा, आधीही त्याने...  दत्ता गाडेचे गुन्हे उघड
दत्ता गाडेचे गुन्हे उघडImage Credit source: social
| Updated on: Feb 28, 2025 | 11:59 AM
Share

पुणे.. विद्येचे माहेर अशी ओळख असलेल्या पुण्यात गेल्या काही महिन्यांत गुन्ह्यांच्या एवढ्या भयानक घटना घडल्या आहेत, त्यामुळे याच शहराची ओळख आता गुन्ह्यांचे माहेर अशी होते की काय अशी भीती लोकांना वाटू लागली आहे. याच पुण्यातील स्वारगेट बस स्टॅँड परिसरात सोमवारी पहाटे एक 26 वर्षांच्या तरूणीवर बसमध्ये बलात्कार करण्यात आला. आरोपी दत्ता गाडेने फसवून तिला बसमध्ये चढवलं आणि एकदा नव्हे तर दोनवेळा तिच्यावर अत्याचार केला आणि तो फरार झाला. पीडित तरूणीच्या तक्रारीनंतर हे प्रकरण उघडकीस आलं आणि संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत तपासाची चक्रं फिरवली आणि तब्बल 70 तास शोध घेत अखेर काल मध्यरात्रीच्या सुमारा आरोपी गाडे याला त्याच्या गावातजवळील शेतातून अटक केली.

एक कॅनॉलमध्ये लपून बसलेला तो पाणी पिण्यासाठी गावातील घरात गेला. ज्य महिलेने त्याला पाणी दिलं., तिनेच पोलिसांना फोन करून त्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला चारही बाजूंनी घेरत बाहेर यायचे आदेश दिले. अखेर मध्यरात्री 1.30 च्या सुमारास आरोपी गाडे बाहेर आला आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. त्याला लष्कर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. आज पहाटे त्याची ससूनमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली. 11 च्या सुमारास त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

दरम्यान गाडे याला बेड्या ठोकल्यानंतर अनेक मोठे खुलासे झाले आहेत

1) आरोपी दत्ता गाडेचा अनेकदा बस स्थानक परिसरात वावर असल्याचं स्पष्ट झालं.

2)आरोपीच गाडेचे बहुतांश वेळा रात्रीचे लोकेशन हे बस स्थानकातील असल्याचं आढळलं आहे.

3) विकृतीमधूनच आरोपीने अनेकदा बस स्थानकात सावज हेरण्याचा प्रयत्न केला होता.

4) आपण पोलीस असल्याचं सांगून गाडे हा मुलींसोबत ओळख करायचा.

5) अशीच फसवणूक करत याआधी त्याने दोन मुलींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता.

6) दत्तात्रय गाडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे, याआधीही त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

7) पोलिसांकडून आरोपी दत्ता गाडेची सखोल चौकशी सुरू आहे.

अशी झाली अटक

1) आरोपी दत्तात्रय गाडे हा गुनाट गावातील उसाच्या शेतात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

2) काल दिवसभर पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून दत्तात्रय गाडेचा शोध घेतला, पण तो सापडला नाही.

3) रात्री. 11.45 च्या सुमारास आरोपी गाडे हा एका घरात पाणी पिण्यासाठी गेला होता.

4) तो ज्या घरात पाणी प्यायला, त्या घरातील महिलेने पोलिसांना फोन करून गाडेची माहिती दिली.

5) पोलिसांनी अर्ध्या तासाच्या आतच गाडेला चारही बाजूंनी घेरलं

6) ड्रोनच्या माध्यमातून दत्ता गाडेला तू बाहेर ये, तुला घेरलंय अशी उद्घोषणा पोलिसांनी केली

7) त्यानंतर कॅनालच्या खड्ड्यात लपलेला दत्ता गाडे हा आरोपी बाहेर आला आणि पोलिसांनी त्याला अटक केली

8) मध्यरात्री 1 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

9) महिलेने पोलिसांना माहिती दिल्यानंतर तब्बल 2 तासांपेक्षीा जास्त हे सर्च ऑपरेशन सुरू होतं.

10) गाडेला अटक करण्यासाठी पोलिसांना गुनाट गावातील ग्रामस्थांची मोठी मदत झाली.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.