सोसायटीवाले मेटेनन्सचे पैसे घ्यायला गेले तर घरातून दुर्गंधी येत होती, त्यांनी पोलिसांना बोलावून दरवाजा उघडला तर…

सोसायटीवाले मेंटेनन्स गोळा करत होते. यावेळी ते एका घराजवळ आले असता त्यांना आतून दुर्गंधी येऊ लागली. त्यांनी पोलिसांना बोलावून दरवाजा उघडला अन् त्यांना धक्काच बसला.

सोसायटीवाले मेटेनन्सचे पैसे घ्यायला गेले तर घरातून दुर्गंधी येत होती, त्यांनी पोलिसांना बोलावून दरवाजा उघडला तर...
क्षुल्लक कारणातून डिलिव्हरी बॉयकडून शेजाऱ्याची हत्या
Follow us
| Updated on: Jun 13, 2023 | 5:09 PM

मुंबई : मीरा रोड आणि चर्चगेट येथील हत्याकांडाच्या घटना ताज्या असतानाच मुंबईतील शाहूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका फूड डिलिव्हरी बॉयने शेजारी राहणाऱ्या व्यक्तीची हत्या केली आणि त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह बेडशीटमध्ये गुंडाळून घरीच लपवून ठेवला. क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात फूड डिलिव्हरी बॉयने हे कृत्य केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीला अटक करण्यात यश मिळवले. जेम्स पॉल कानारन असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलमांतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोसायटीतील रहिवाशांनी घटनेबाबत पोलिसांना खबर दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

घरातून दुर्गंधी येऊ लागली आणि हत्येचा उलगडा झाला!

आरोपी जेम्स हा शाहूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये फूड डिलिव्हरीचे काम करायचा. मागील अनेक दिवसांपासून त्याने या परिसरात सेवा सुरू ठेवली होती. त्यामुळे त्याला सोसायटीतील लोक चांगले ओळखत होते. हत्या झालेला व्यक्ती हा जेम्सच्या शेजारीच राहत होता. जेम्सने हत्या केल्यानंतर घटनेची कुणालाच कुणकुण लागू दिली नव्हती.

मात्र ज्यावेळी सोसायटीतील प्रमुख पदाधिकारी घराचा मेंटेनेस जमा करण्यासाठी हत्या झालेल्या व्यक्तीच्या घरी गेले होते, त्यावेळी त्यांना घरातून प्रचंड दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. त्यावर सोसायटीतील सदस्यांनी तातडीने पोलिसांना खबर दिली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याची झडती घेतली असता एका बेडशीटमध्ये मृतदेह गुंडाळण्यात आल्याचे आढळून आले.

हे सुद्धा वाचा

सापळा रचून आरोपीला अटक

पोलीस तपासादरम्यान हत्येमागील कारण उघड झाले आहे. जेम्सला शुक्रवारी रात्री हत्या झालेल्या व्यक्तीने आपल्या घरी दारू पिण्यासाठी बोलावले होते. एकत्र दारू पीत असतानाच दोघांमध्ये शुल्लक कारणावरून खटका उडाला आणि नंतर या वादाचे पर्यावसान हत्येमध्ये झाले. जेम्सने हत्या केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला होता आणि परिसरात गुप्त आश्रय मिळवला होता. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक करण्यात यश मिळवले.

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.