फॅमिलीचा फोटो काढला,अन् संपूर्ण कुटुंबालाच संपवले, एक रहस्य लपवण्यासाठी ७ जीव घेतले
आपण अशा नराधम इसमाची कहाणी जाणून घेणार आहोत ज्याने आपल्या स्वत:च्या संपूर्ण कुटुंबाला ख्रिसमसच्या दिवशी ठार केले. एकूण सात सदस्याची त्याने बेछुटपणे गोळ्या घालून हत्या केली.

ख्रिसमसचा तो दिवस त्या निष्पाप पत्नी आणि मुलांचा शेवटचा दिवस ठरला. चार्ल्स डेव्हीस लॉसन यांच्या कुटुंबासाठी हा दिवस काळरात्र ठरला. तंबाकूचा शेतकरी असलेल्या चार्ल्स लॉसन याने डिसेंबर महिन्यात आपल्या संपूर्ण कुटुंबाचा एका स्टुडिओ सुंदर फोटो काढला. त्याकाळात व्यावसायिक फोटोग्राफी ही महागडी बाब होती. परंतू चार्ल्सने खास हे फोटोशुट केले.
फोटोत चार्ल्स त्याची पत्नी फॅनी, त्याची सात मुले आणि स्वत:तो कॅमेऱ्या समोर उभा दिसतो. परंतू काही दिवसात सर्वकाही बदलले २५ डिसेंबर १९२९ ची सकाळ…मॅरी किचनमध्ये केक बनवत होती. मुलं आनंदी होती परंतू चार्ल्सच्या मनात हैवान शिरला होता.जर्मैनटन, नॉर्थ कॅरोलाइना अमेरिकेतील ही थरारक घटना आहे.
सर्वात आधी चार्ल्सची नजर त्याच्या दोन मुली कॅरी ( १२ ) आणि मॅबेल ( ७) यांच्यावर पडली. दोघे घरातून काका-काकींना भेटायला निघाले होते. चार्ल्स वाटेत आधीच लपला होता. त्याने शॉटगनने दोघांवर हल्ला केला, त्यानंतर त्यांना आपटून ठार केले. मृतदेहांना खेचून बागेत टाकले. त्यानंतर तो घरी आला पत्नी फॅनी ( ३७ ) ला गोळी घातली. नंतर मोठी मुलगी मॅरीवर बंदूक रोखली तिच मुलगी तिच्याबद्दल जे सत्य बाहेर आले त्याने सर्वांनाच हैराण केले. मॅरीचा देखील जीव घेतला. त्यानंतर लहान मुलगा जेम्स (४) आणि रेमंड ( २ ) यांना देखील निर्दयीपणे ठार केले. शेवटी त्याच्याकडेवरील चार महिन्यांच्या मॅरी लू हीला देखील सोडले नाही. या लहानगीचे डोके ठेचून त्याने तिला ठार केले.
एक मुलगा वाचला…
जेव्हा लोकांना मृतदेह पाहिले तेव्हा त्यांचा थरकाप उडाला. सर्व मृतदेहांना हात जोडलेल्या स्थितीत ठेवले होते. डोक्याखाली दगड ठेवले होते. जसे कोणी काही जादूटोणा केला असावा. सर्वात मोठा मुलगा आर्थर मात्र वाचला.त्याला आदल्या रात्री काही कामासाठी बाहेर पाठवले होते. आर्थर घरी आला त्याने हे भयंकर दृश्य पाहिले आणि पोलिसांना कळवले. चार्ल्स याचा शोध सुरु झाला नंतर जंगलातून बंदूकीच्या फैरींचा आवाज आला. चार्ल्स याने आत्महत्येपूर्वी काही पत्र लिहीली होती. झाडाच्या भोवती पावलांच्या खूणा होत्या. चार्ल्स मरण्यापूर्वी विचार करत फिरत होता. अखेर सवाल निर्माण झाला की चार्ल्सने संपूर्ण कुटुंबाला का संपवले.
६० वर्षांनंतर हे रहस्य उघड
साल १९९० मध्ये ६० वर्षांनंतर हे रहस्य उघड झाले. स्टेला बोल्स नावाच्या महिलेने जी या कुटुंबाची नातलग होती. स्टेलाने सांगितले की तिची आई आणि इतर महिलांनी त्यावेळी चर्चा केली होती की फॅनी ( चार्ल्स याची पत्नी ) हिला तिची मुलगी ( मॅरी ) आणि तिच्या पतीमध्ये असलेल्या अनैतिक संबंधाबद्दल माहिती झाले होते. वास्तविक चार्ल्स स्वत:च्या मुलगी मॅरी हीचे लैंगिक शोषण करीत होता. मॅरीने तिची मैत्री एला मे जॉनसन हीला देखील हा प्रकार सांगितला होता. तिने सांगितले होते की ती गर्भवती होती आणि बाळ तिच्या वडीलांचे होते. फॅनीला जेव्हा हे कळले तेव्हा कुटुंबात तणाव वाढला. आणि भीती आणि लाजेखातर चार्ल्स हे रहस्य बाहेर येण्याआधीच सर्वांना ठार केले.
