माथेफिरु पतीचा पत्नीवर हल्ला, वाचवण्यासाठी आलेल्या शेजाऱ्यालाही केले जखमी; वाचा काय आहे प्रकरण ?

सुनीलला आपल्या पत्नीचे दुसऱ्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या संशयातून पती-पत्नीमध्ये गेल्या दिवसापासून वाद होत होते.

माथेफिरु पतीचा पत्नीवर हल्ला, वाचवण्यासाठी आलेल्या शेजाऱ्यालाही केले जखमी; वाचा काय आहे प्रकरण ?
माथेफिरु पतीचा पत्नीवर हल्लाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Sep 26, 2022 | 3:27 PM

कल्याण / सुनील जाधव (प्रतिनिधी) : पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक (Arrest) केली आहे. सुनील शिंदे असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. पती-पत्नीमधील भांडण सोडवण्यासाठी आलेल्या शेजाऱ्यावरही पतीने हल्ला (Attack) केला आहे.

कल्याणमधील कोळसेवाडी तिसगाव परिसरात सुनील शिंदे हा आपली पत्नी श्वेता शिंदे सोबत राहत होता. सुनीलला आपल्या पत्नीचे दुसऱ्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या संशयातून पती-पत्नीमध्ये गेल्या दिवसापासून वाद होत होते.

दोघांमध्ये वाद सुरु झाला, मग वादाचे हत्येत रुपांतर झाले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारित्र्याच्या संशयावरून नेहमीप्रमाणे आज सकाळीही साडेअकराच्या सुमारास दोघांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, संतप्त झालेल्या सुनीलने पत्नीवर जीवघेणा हल्ला करण्यास सुरुवात केली.

हे सुद्धा वाचा

भांडण सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेजाऱ्यावरही जीवघेणा हल्ला

पत्नीने आपला जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पळ काढला. मात्र सुनीलही तिच्या मागोमाग पळाला. सुनीलला शेजारने थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र संतप्त झालेल्या सुनीलने भांडण सोडवण्यासाठी आलेल्या शेजाऱ्यावरही हल्ला केला.

जखमी शेजाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरु

या हल्ल्यात शेजारी जखमी झाला. संदेश परब असे जखमी शेजाऱ्याचे नाव आहे. त्यानंतर पुन्हा पत्नीवर हल्ला करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यानंतर शेजाऱ्यांनी कुणीही तिची मदत करण्यासाठी पुढे न येता संबंधित घटनेची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत माथेफिरू पतीला ताब्यात घेतले. तसेच गंभीर जखमी झालेला संदेशला उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले. सध्या कोळसेवाडी पोलीस गुन्हा दाखल करत पुढचा तपास सुरू केला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.