AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळाला दूध पाजण्याचा बहाण्याने… लेस्बियन आईचा पराक्रम! काळीज पिळवटून टाकणारी घटना

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लेस्बियन आईने पोटच्या पाच महिन्यांच्या पोरासोबत जे काही केलं ते ऐकून पोलिसांच्याही पायाखालची जमीनच सरकली.

बाळाला दूध पाजण्याचा बहाण्याने... लेस्बियन आईचा पराक्रम! काळीज पिळवटून टाकणारी घटना
CrimeImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 08, 2025 | 7:02 PM
Share

एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आईने ५ महिन्यांच्या पोटच्या पोराची हत्या केली आहे. या हत्येमागचे कारण ऐकून पोलिसांच्याही पायखालची जमीनच सरकली आहे. महिलेने खरच असे केले असेल का? असा प्रश्न सर्वांना पडला होता. पण नंतर मोबाईल मधील चॅट्सने अखेर सत्य समोर आले आहे. महिला आणि तिच्या प्रेयसीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्या दोघींचीही चौकीशी केली जात आहे. नेमकं काय घडलं चला जाणून घेऊया…

तमिळनाडूतील केलमंगलम येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. एका आईने आपल्या ५ महिन्यांच्या मुलाची हत्या केली, कारण ऐकून कोणीही थक्क होईल. महिलेवर आरोप आहे की तिने मुलाला आपल्या महिला मित्रासोबतचे नाते तोडायचे नव्हते म्हणून मारले, आणि मूल तिला ओझे वाटू लागले होते.

चार वर्षांपासून नाते सुरू होते

तमिळनाडूतील केलमंगलम येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. २६ वर्षीय भारतीचे लग्न सुरेश नावाच्या व्यक्तीशी झाले होते. दोघांना दोन मुली आणि एक मुलगा होता. पण लग्न झालेले असूनही भारतीचे तिच्या परिसरातीलच एका तरुणी सुमित्रा (२२) सोबत चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पती कामावर गेल्यावर भारती सुमित्राच्या घरी जायची. दोघींमध्ये इतके चांगले नाते होते की त्यांनी एकमेकांच्या नावाचे टॅटूही काढले होते.

मुलाच्या जन्मानंतर नाते बिघडू लागले

समोर आलेल्या माहितीनुसार, मुलाच्या जन्मानंतर भारती आणि सुमित्रामध्ये भांडणे वाढू लागली. सुमित्राला वाटत होते की मूल त्यांच्या नात्यात अडथळा आणत आहे. याच कारणावरून दोघींमध्ये अनेकदा भांडणे झाली. एक दिवस राग आणि बहकाव्यात येऊन भारतीने आपल्या मुलाचा गळा दाबला. नंतर तिने कुटुंबाला सांगितले की दूध पाजताना मुलाचे डोके आपटले आणि त्याचा मृत्यू झाला. कुटुंबाने विश्वास ठेवला आणि मुलाचे अंत्यसंस्कारही केले.

मोबाईलने उघड केले सत्य

पण कहाणी येथेच संपली नाही. काही दिवसांनंतर भारतीचा पती सुरेशला तिच्या फोनमध्ये काही व्हिडीओ आणि फोटो सापडले, ज्यात भारती आणि सुमित्राचे खाजगी क्षण रेकॉर्ड होते. तेव्हा सत्य समोर आले. सुरेशने पोलिसांत तक्रार दाखल केली आणि सर्व पुरावे सुपूर्द केले. पोलिसांनी दोन्ही महिलांना अटक केली.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.