Abhishek Ghosalkar : मॉरिस निघाला पक्का ‘खिलाडी’, पिस्तुलासाठी स्वत:च्या बॉडीगार्डसोबत खेळली चाल, सोनी मिश्रांचा धक्कादायक खुलासा

Abhishek Ghosalkar Murder Case : शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणातील आरोपी मॉरिस भाई याने खूप आधीच प्लॅन केल्याचं समोर येत आहे.

Abhishek Ghosalkar : मॉरिस निघाला पक्का 'खिलाडी', पिस्तुलासाठी स्वत:च्या बॉडीगार्डसोबत खेळली चाल, सोनी मिश्रांचा धक्कादायक खुलासा
Follow us
| Updated on: Feb 09, 2024 | 7:44 PM

मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आरोपी मॉरिस भाई याने फेसबुक लाईव्ह करत घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये त्यांना चार गोळ्या लागल्या होत्या. त्यानंतर आरोपी मॉरिस भाई यानेही स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. या घटनेने दहिसर परसरात खळबळ उडाली होती. हल्ल्यात वापरण्यात आलेली गन ही त्याचा बॉडीगार्ड असल्याचं तपासात समोर आलं. पोलीस बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्रा याचा तपास करत आहेत. या दरम्यान अमरेंद्र मिश्रा याची पत्नी सोनी शर्मा हिने मोठा खुलासा केला आहे.

बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्राची पत्नी काय म्हणाली?

अमरेंद्र मिश्रा नावाच्या व्यक्तीला 2002 मध्ये पिस्तूलाचं लायसन्स मिळालं होतं. मिश्राने उत्तर प्रदेशातून पिस्तुल नुतनीकरण केल्याचेही पुरावेदेखील समोर आले आहेत. हीच पिस्तुल मॉरिसने घोसाळकर यांच्या हत्येसाठी वापरली आहे. आम्हाला ती अट मान्य न्हवती मात्र कामाची गरज असल्याने अमरेंद्र मिश्रा तयार झाले. घटनेच्या वेळी माझ्या पतीला मॉरिसने त्याचा मित्र मेहुल पारेखसोबत रूग्णालयात पाठवले होते. मेहुलची आई करुणा रुग्णालयात एडमिट आहे तिकडे हे दोघेही गेले होते.आम्हाला घटनेची माहिती पोलिसांकडून रात्री ३ वाजता मिळाली त्यावेळी धक्का बसला. मी स्वतः माझ्या पतीला पोलिसाकडे घेऊन गेले मात्र आता माझ्या पतीला भेटूही दिलं जात नसल्याचं सोनी मिश्रा यांनी सांगितलं.

सोनी मिश्रा यांनी सांगितल्यानुसार मॉरिस भाईच्या डोक्यात सर्व काही आधीच ठरलं होतं. अभिषेक घोसाळकर यांना संपवणार असल्याचं वारंवार ते बोलत असल्याचं त्याच्या पत्नीने जबाबात म्हटलं आहे. मॉरिस भाई याने हत्सेसाठी बंदुक मिळवण्यासाठी परवाना असलेला बॉडीगार्डलाच कामावर ठेवलं.  कामावर ठेवताना त्याने गन कायम कार्यालयातील ड्रॉव्हरमध्ये ठेवायची अशी अट घातली होती.  एकंदरित मॉरिस भाईने बॉडीगार्डसोबतच मोठा डाव खेळला.

कार्यालयातील ड्रॉव्हरमध्ये गन होती त्याची चावी फक्त तुझ्याकडेच राहिल असं सांगण्यात आलं होतं. मात्र त्याची आणखी एक चावी मॉरिस भाई याच्याकडेसुद्धा होती. याच गनच्या मदतीने त्याने अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबुक लाईव्हवेळी हल्ला केला.

दरम्यान, सोनी मिश्रा यांनी आपल्या पतीचा याच्याशी काहीही संबंध नसून त्यांचा वापर झाल्याचं  म्हटलं आहे. बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्रा यांना खरंच या कटाविषयी माहिती होती का? या कटामध्ये त्यांचा काही समावेश होता का? याचा पोलीस तपास करत आहेत.

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.