मुलींनो एयर होस्टेस, पायलट बनायचंय? पण ‘अशा’ नराधमांपासून सावधान

कित्येक मुलींचं एयर होस्टेस किंवा पायलट बनण्याचं स्वप्न असतं. त्यासाठी ते मेहनतही घेतात.

मुलींनो एयर होस्टेस, पायलट बनायचंय? पण 'अशा' नराधमांपासून सावधान
प्रातिनिधिक फोटो (साभार - सोशल मीडिया)

भोपाळ : कित्येक मुलींचं एयर होस्टेस किंवा पायलट बनण्याचं स्वप्न असतं. त्यासाठी ते मेहनतही घेतात. अगदी काही मुली स्वत:च्या कर्तृत्वार मेहनत करुन पायलट किंवा एयर होस्टेस बनून दाखवतात. पण काही मुली या योग्य संधीची वाट बघत असतात. एयर होस्टेस किंवा पायलट बनावं अशी त्यांची मनापासून इच्छा असते. पण त्यांना काही कारणास्तव यश मिळत नाही. पण याच गोष्टीची संधी साधून काही भामटे नोकरीचे खोटे आश्वासन देऊन पैसे उकळतात. नोकरीच्या नावाने तरुणींकडून लाखो रुपये घेतात. त्यानंतर मोबाईल नंबर बदलून तरुणीचं फसवणूक करतात. त्यामुळे अशा ठगांपासून सावध राहावं, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. कारण अशाच प्रकारचं एक प्रकरण सध्या चर्चेत आलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

इंडिगो एयरलाईन्समध्ये नोकरी मिळवून देतो असं सागून 22 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला मध्य प्रदेशच्या भोपाळ सायबर क्राईमने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने अनेक बेरोजगार किंवा नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणींना एयरलाईन्समध्ये नोकरी मिळवून देतो असं सांगत लाखोंचा गंडा घातल्याची धक्कादायक माहिती आता पोलिसांच्या तपासातून समोर येऊ लागली आहे. विशेष म्हणजे आरोपी हा पेशाने एयरोनॉटिकल इंजीनिअर आहे.

मुलीच्या नावाने फेक अकाउंट तयार करुन फसवणूक

एका तरुणीने सायबर सेलकडे संबंधित आरोपीची तक्रार केली होती. आरोपीने इन्स्टाग्रामवर मुलीच्या नावाने फेक अकाउंट तयार केलं होतं. त्याद्वारे त्याने तरुणीसोबत ओळख केली. आरोपीने इन्स्टाग्रामवर रामिया सेन नावाने अकाउंट तयार केलं होतं. आपण इंडिगो एयरलाईन्समध्ये काम करत असून रुद्रसिंह नावाच्या व्यक्तीने आपल्याला तिथे जॉब मिळवून दिला, असं त्याने रामिया सिंह नावाच्या अकाउंटवर तरुणीला माहिती दिली. त्यानंतर त्याने रामिया नावाच्या अकाउंटवरुन रुद्रसिंह म्हणजे त्याचा मोबाईल नंबर दिला. तरुणीने त्या नंबरवर फोन करुन त्याच्यासोबत बातचित केली. आरोपीचं खरं नाव रोशन सिंह असं आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी रोशन सिंहच्या विरोधात कलम 419, 420, 120 (बी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी आरोपीला बेड्या कशा ठोकल्या?

पोलिसांनी तपास करत असताना त्यांच्याकडे आणखी एका तरुणीने सारखीच तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी तापासाला आणखी गती दिली. खरंतर आरोपी हा मुळचा पाटण्याचा होता. पोलीस पाटण्यातील आरोपीच्या घरी गेले. पण आरोपी तिथून फरार झाला. पोलीस आरोपीचा मोबाईल नंबर वारंवार ट्रेस करुन त्याच्या लोकेशनची माहिती मिळवत होते. अखेर आरोपी गुरुग्राममध्ये लपून बसला होता. तिथे त्याने आपला मोबाईल सुरु केला. त्याची माहिती सायबर क्राईम पोलिसांना मिळाली. पोलिसांनी हरियाणाच्या गुरुग्राम येथे जाऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. आरोपीने आणखी किती मुलींना फसवलं याचा तपासही पोलीस करत आहेत.

हेही वाचा : आईच्या मृतदेहाजवळ बाहुल्यांशी खेळत बसलेल्या दोघी मुली, नंतर दिली हत्येची कबुली

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI