व्हिडीओ गेम खेळताना मैत्री, नंतर प्रेम; अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांच्या बेड्या

व्हिडीओ गेम खेळताना मैत्री, नंतर प्रेम; अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांच्या बेड्या
नवी मुंबई पोलिस

FREE FIRE नावाच्या ऑनलाइन व्हिडीओ गेम खेळताना एका अल्पवयीन मुलीसोबत मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध बनवून मुलीला भेटण्यासाठी चक्क 19 वर्षीय युवक दिल्लीमधून नवी मुंबईत आला.

Akshay Adhav

|

Feb 21, 2021 | 6:43 AM

नवी मुंबई : परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. FREE FIRE नावाच्या ऑनलाइन व्हिडीओ गेम खेळताना एका अल्पवयीन मुलीसोबत मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध बनवून मुलीला भेटण्यासाठी चक्क 19 वर्षीय युवक दिल्लीमधून नवी मुंबईत आला आणि मुलीला घेऊन पळून गेला आणि लग्नाचे आमिष दाखवून 4 ते 5 वेळा बलात्कार केला. सदर आरोपीला नवी मुंबई रवाले एमआयडीसी पोलिसांनी हरियाणाच्या गुडगावमधून अटक करून मुलीची सुखरूप सुटका केली आहे. (Accused of abusing a minor girl arrested by Navi Mumbai police)

संबंधित मुलीला घेऊन आरोपी ताबीज तुफेल खान (वय 19) 12 दिवस उत्तरप्रदेश, दिल्ली, हरियाणा, गुडगाव या परिसरात फिरत होता. परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे ,सहायक पोलिस आयुक्त विनायक वस्त, रवाले एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्राईम रामचंद्र घाडगे आणि यशवंत पाटील यांनी 3 पथकं तयार केली होती. याच पथकांनी सदर मुलीची सुटका करुन आरोपीला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवाले एमआयडीसी पोलीस ठाण्याचे हद्दीतून 1 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 2 च्या सुमारास 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरण झाल्याची फिर्याद पालकांनी दिली होती. सदर मुलगी राहणाऱ्या घरातून कोणाला काही न सांगता पळून गेली असे पालकांनी पोलिसांना सागितलं. पोलिसांनी अपहरणचा गुन्हा दाखल करून पथक तयार केलं. सदर पथक डीसीपी सुरेश मेंगडे आणि सहायक पोलिस आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलं होतं.

पथकाला मिळालेल्या माहितीनुसार मिळाले की सदर मुली एका इसमाच्या सोबत दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणामध्ये गेला. माहिती मिळाल्यावर पथक रवाना करण्यात आला. ज्यावेळी पथक दिल्लीला पोहचलं त्यावेळी आरोपी तिथून गुडगावला पळला. पथकाने हरियाणा पोलीसांच्या मदतीने आरोपी ताबीज तुफेल खान याला गुडगावच्या सरोली गावातून ताब्यात घेतले आणि मुलीची सुटका केली.

आरोपी ताबीज खानची चौकशी केल्यावर त्याने सांगितले की, पीडित अल्पवयीन मुलीसोबत मोबाईलवर FREE FIRE नावाच्या ऑनलाईन व्हिडिओ गेम खेळत असताना ओळख वाढवली. नंतर तिच्याशी मैत्री करुन प्रेमसंबंध निर्माण केली. मुलीच्या पालकांना न सांगता मुलीचं अपहरण करुन परिसरातून तिला पळवून दिल्ली नेले. तसेच अपहरण करून मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या सोबत 4 ते 5 वेळा बलात्कार केला.

आरोपी ताबीज खानवर बलात्कार, अपहरण, पोक्सो कायद्यातर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय असून त्याला वेळापूर कोर्टात दाखल केले असता कोर्टाने 22 फेब्रुवारी पर्यंत आरोपीला पोलीस कोठडी दिली आहे. ऑनलाईन गेमच्या साहाय्याने अजून किती मुलींसोबत अशी कृत्य केली का, याचा शोध रवाले एमआयडीसी पोलीस घेत आहेत.

(Accused of abusing a minor girl arrested by Navi Mumbai police)

हे ही वाचा :

Video : उकळत्या तेलात हात घालून महिलेच्या चारित्र्यसंपन्नतेची परीक्षा! हा कसला न्यायनिवाडा?

पुणे पोलीस फरार गजा मारणेच्या शोधात, मालमत्ता जप्तीसह लपण्यास मदत करणाऱ्यांवरही कारवाई होणार

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें