AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Acid Attack : दिल्ली हादरली! विद्यार्थिनीवर अ‍ॅसिड हल्ला, कॉलेजला जाताना एकटीला गाठलं अन्…

Delhi Crime: दिल्लीतील लक्ष्मीबाई कॉलेजजवळ एका विद्यार्थिनीवर अ‍ॅसिड हल्ला झाला आहे. आज (रविवार) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेनंतर जखमी विद्यार्थिनीला दीपचंद बंधू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Delhi Acid Attack : दिल्ली हादरली! विद्यार्थिनीवर अ‍ॅसिड हल्ला, कॉलेजला जाताना एकटीला गाठलं अन्...
acid attack
| Updated on: Oct 26, 2025 | 10:09 PM
Share

राजधानी दिल्ली ही महिलांसाठी सुरक्षित नाही हे पुन्हा एकदा समोर आले आहे. दिल्लीतील लक्ष्मीबाई कॉलेजजवळ एका विद्यार्थिनीवर अ‍ॅसिड हल्ला झाला आहे. आज (रविवार) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेनंतर जखमी विद्यार्थिनीला दीपचंद बंधू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही विद्यार्थिनी लक्ष्मीबाई कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिकत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

विद्यार्थीनीवर अ‍ॅसिड हल्ला

समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थीनी आणि ओरोपीची ओळख होती. आरोपी जितेंद्र हा गेल्या काही काळापासून मुलीला त्रास देता होता. आज पीडित मुलगी अशोक विहारमधील क्लासमधून कॉलेजला जात होती. त्यावेळी आरोपी जितेंद्र हा मित्र ईशान आणि अरमानसह मोटारसायकलवरून आला आणि तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला केला. घटनेनंतर आरोपी पळून गेला आहे. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने आणि एफएसएल टीमने घटनास्थळाची पाहणी केली असून पोलीसांनी तपास सुरू केला आहे.

आरोपी आणि पीडितेची ओळख

आरोपी जितेंद्र आणि विद्यार्थिनीची ओळख होती. आज जितेंद्र आणि त्याचे दोन मित्र ईशान आणि अरमान हे तिघे तिच्यावर हल्ला करण्यासाठी मोटारसायकलवरून आले. इशानने अरमानकडे बाटली दिली, त्यानंतर अरमानने विद्यार्थिनीवर अ‍ॅसिड फेकले. त्यावेळी पीडितेने हाताने चेहरा वाचवण्याचा प्रयत्न केला, यात तिचे दोन्ही हात जखमी झाले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच पोलीसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले. यावेळी गुन्हे शाखेच्या पथकाने आणि एफएसएलच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. पीडित विद्यार्थीनीच्या जबाबावरून आणि जखमांच्या स्वरूपावरून आरोपींवर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून दिल्ली पोलीसांनी अधिक तपास सुरू केला आहे. यावेळी पीडित विद्यार्थिनीने जितेंद्र माझा पाठलाग करत होता आणि सुमारे एक महिन्यापूर्वी आमच्या दोघांमध्ये वाद झाला होता अशी माहिती दिली आहे.

पोलीस आरोपींच्या शोधात

दिल्लीतील या घटनेनंतर गुन्हे शाखेच्या पथकासह आणि एफएसएलच्या पथकानेही घटनास्थळाची पाहणी केली. दिल्ली पोलीस आता आरोपींच्या शोधात आहेत. यासाठी आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.

सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.