‘स्टुडंट ऑफ द इयर’ फेम प्रसिद्ध अभिनेत्यावर बलात्काराचे आरोप… अभिनेत्रीच्या वक्तव्यामुळे बॉलिवूड हादरलं!

मिश्राने बुलेट राजा, दम लगा कर हैशा आणि स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटामधील अभिनेत्यावर टीव्ही अभिनेत्रीने बलात्काराचे आरोप केले आहेत.

'स्टुडंट ऑफ द इयर' फेम प्रसिद्ध अभिनेत्यावर बलात्काराचे आरोप... अभिनेत्रीच्या वक्तव्यामुळे बॉलिवूड हादरलं!
Follow us
| Updated on: May 02, 2023 | 11:33 PM

मुंबई : ‘मिश्राने बुलेट राजा’, द’म लगा कर हैशा’ आणि ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटामधील अभिनेत्यावर टीव्ही अभिनेत्रीने बलात्काराचे आरोप केले आहेत. एका वेब सीरिजमधील त्याच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीने आरोप केले आहेत. शशांक मिश्रा असं आरोप करण्यात आलेल्या अभिनेत्याचं नाव आहे.

पीडितेने या वर्षी मार्चमध्ये बांगूर नगर पोलिस स्टेशनमध्ये पैशाच्या व्यवहाराबाबत आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. परंतु मारहाण गैरवर्तनाचा कोणताही आरोप केला नाही. काही दिवसांनी पीडितेने गोरेगाव पोलीस ठाण्यात दुसरी तक्रार दाखल केली, पण यावेळीसुद्धा लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला नव्हता, असा आरोप शशांकची बाजू मांडणारे वकील शैलेंद्र मिश्रा यांनी केलाय.

काही दिवसांनी पीडितेने गोरेगाव पोलीस ठाण्यात दुसरी तक्रार दाखल केली. पण यावेळीपण लैंगिक छळाचा आरोप केला नाही. मात्र काही दिवसांनंतर, एप्रिलमध्ये, पीडितेने लैंगिक छळाची तक्रार दाखल केली, तर लैंगिक छळाचा आरोप जानेवारी ते ऑगस्ट 2022 पर्यंतचा आहे. मिश्रा म्हणाले की, पीडितेने आरोपीवर खोटे आरोप केले आहेत.

शशांक 2021 मध्ये आधीपासूनच दुसर्‍या तरूणीसोबत संबंधात होता. हे पीडितेला माहित होतं तरीसुद्धा तिने जाणीवपुर्वक त्याच्यासोबत लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. शशांकने पीडितेचा फोनही ब्लॉक केला होता कारण ती सतत त्रास देत होती, असा मिश्रा यांनी सांगितलं.

दुसरीकडे, वकील श्रेयांश मिठारे यांनी फिर्यादी तसेच पीडितेची बाजू मांडताना अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध केला की, पीडितेसोबत शारीरिक संबंध असताना आरोपीचे दुसऱ्या महिलेशी संबंध होते. मिठारे यांनी आरोपी आणि पीडित यांच्यातील काही पर्सनल चॅट दाखवत दोघांमध्ये संबंध असल्याचं दाखवलं.

दरम्यान, दोन्ही बाजूंचं म्हणणे ऐकून घेतल्यानंतर, न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी जानेवारी ते ऑगस्ट 2022 या कालावधीत दोघांमध्ये लैंगिक संबंधाची एक नव्हे तर अनेक घटना घडल्याने दोघांमधील संबंध सहमतीने असल्याचं दिसत आहे. त्याला 25 हजार रूपये भरत जामीनावर सोडण्याचे आदेश दिले.

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.