AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आईच्या कडेवर बसलेलं गोंडस बाळ आता आहे बॉलिवूडचा सुपरस्टार, ओळखा पाहू कोण आहे?

तुमचे हे आवडते कलाकार सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. ते त्यांचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आताही एका प्रसिद्ध अभिनेत्याचा एक क्यूट फोटो व्हायरल होत आहे.

आईच्या कडेवर बसलेलं गोंडस बाळ आता आहे बॉलिवूडचा सुपरस्टार, ओळखा पाहू कोण आहे?
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: May 02, 2023 | 10:19 PM
Share

मुंबई : बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. अशा सेलिब्रिटींचे चाहतेही लाखोंच्या संख्येत आहेत. यामध्ये मग सलमान खान असो, शाहरुख खान असो, मनोज वाजपेयी असो, दीपिका पदुकोन असो किंवा प्रियांका चोप्रा असो अशा अनेक कलाकारांनी संपूर्ण जगभरात त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तुमचे हे आवडते कलाकार सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. ते त्यांचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आताही एका प्रसिद्ध अभिनेत्याचा एक क्यूट फोटो व्हायरल होत आहे.

असे अनेक बॉलिवूड स्टार्स आहेत ज्यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यामुळे चाहते नेहमीच त्यांच्या सेलिब्रेटीला फॉलो करत असतात. त्या सेलिब्रेटीचे फोटो आणि व्हिडीओ लाइक करत असतात. काहीवेळा अनेक सेलिब्रेटींचे जुने फोटो समोर येतात, तेव्हा काही चाहते त्या सेलिब्रेटीला ओळखतात तर काही चाहते ओळखायला बर्‍याचदा फसतात.

आता आम्ही तुम्हाला एका बॉलिवूड अभिनेत्याचा बालपणीचा फोटो दाखवत आहोत. सोबतच आम्ही तुम्हाला काही हिंट्स देखील देणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही त्या अभिनेत्याला ओळखू शकाल.

या फोटोत एक क्यूट लहान बाळ त्याच्या आईच्या कडेवर दिसत आहे. या बाळाच्या केसांच्या दोन वेण्या घातल्या आहेत ज्यामुळे तो खूप गोंडस दिसत आहे. फोटोत ते बाळ जेवढे गोंडस दिसत आहे तेच आजही तेवढेच देखणे दिसत आहे. तसंच आज तो बॉलिवूडचा मोठा सुपरस्टार असून लाखो मुली त्याच्यासाठी वेड्या झाल्या आहेत.

2011 मध्ये या अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होतं. आता त्याने अभिनयाच्या जोरावर लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. आज तो अभिनेता इतका प्रसिद्ध आहे की गेल्या वर्षी त्याने चक्क अक्षय कुमारच्या एका चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये त्याची जागा घेतली होती.

विशेष सांगायचं झालं तर या अभिनेत्याची डान्स स्टाईल चित्रपटातून चांगलीच व्हायरल झाली होती. तसंच हा अभिनेता फिर हेरा फेरीच्या पुढच्या भागात अक्षय कुमारची जागा घेणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. यावरून तुम्ही या अभिनेत्याला नक्कीच ओळखलं असेल. होय, हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून कार्तिक आर्यन आहे.  भुल भुलैया 2 या चित्रपटापासून कार्तिक आर्यन चांगलाच प्रसिद्धीझोतात आला आहे. या चित्रपटात त्यानं अक्षय कुमारची जागा घेतली होती.

Follow Us
ज्ञानेश कुमार हटाव! दिल्लीच्या रस्त्यावर इंडिया आघाडीचा एल्गार,
ज्ञानेश कुमार हटाव! दिल्लीच्या रस्त्यावर इंडिया आघाडीचा एल्गार, खासदारांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा ‘लोकशाही वाचवा’ मोर्चा, ज्ञानेश कुमार...
दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा ‘लोकशाही वाचवा’ मोर्चा, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
मतदारांच्या हक्कांसाठी SIR का महत्त्वाचं? CM फडणवीसांनी दिली माहिती
मतदारांच्या हक्कांसाठी SIR का महत्त्वाचं? CM फडणवीसांनी ट्विट करत दिली मोठी अपडेट
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर...
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर घणाघात; थेट म्हणाले...
पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! विवेक भिमनवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्य
पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! विवेक भिमनवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना नोटिसा
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे...
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे नियम काय?
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही;
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही; पक्षाने मांडली स्पष्ट भूमिका
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही...
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही आलं समोर
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी...
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्ध्यातच थांबवलं भाषण, नेमकं काय घडलं?