Pune Crime : साखरपुडा झाल्यावर शरीर संबंध ठेवत होणाऱ्या बायकोला सहा लाखांचं कर्ज काढायला लावलं, अन्… पुण्यातून धक्कादायक घटना समोर!
अनेकवेळा तर लग्नाची तारीख येईपर्यंत लग्न मोडतं, याची कारणं काय तर मुलाचं आणि मुलीचं कोणत्या गोष्टीवरून भांंडण होतं. पुण्यातून एक धक्कादाय घटना समोर आली आहे.

पुणे : लग्न ठरल्यावर पहिला साखरपुडा उरकून घेतात आणि त्यानंतर लग्नाची तारीख काढतात. अनेकवेळा तर लग्नाची तारीख येईपर्यंत लग्न मोडतं, याची कारणं काय तर मुलाचं आणि मुलीचं कोणत्या गोष्टीवरून भांंडण होतं. नाहीतर तरूण किंवा तरूणी आपल्या बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडसोबत पळून जातात. मात्र पुण्यातून एक धक्कादाय घटना समोर आली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
पुण्यातील 22 वर्षीय तरूणीने पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये मंगळवारी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तरूणीने दिलेल्या तक्रारीवरून मुलगा आणि त्याच्या वडिलांवर गुन्ह दाखल केला आहे.
दोघांचा साखरपुडा झाला होता, त्यानंत आरोपा मुलाने तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. फिरायला नेण्याच्या बहाण्याने आरोपीने फिर्यादीने नकार देऊनही तिच्यासोबत अनेकवेळा संबंध ठेवले. आरोपीच्या वडिलांनी फिर्यादी मुलीला विश्वासात घेत तिच्या नावावर कर्ज काढण्यास भाग पाडलं.
आरोपी मुलाचे शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाले होते. तरूणीकडून 5 लाख 22 हजार ऑनलाईन घेतले. काही दिवसांना आरोपी मुलाने तरूणीसोबत किरकोळ कारणावरून भांडण केलं. भाडणं केलं मात्र तिला काही पैसे माघारी केले नाही. जर ती पैसे माघायला आली तर तर तुझ्यासह घरच्यांना जिवंत मारून टाकेल, अशी धमकी देत तिला शिवीगाळ केली. असं फिर्यादीने तक्रारीमध्ये म्हटलं आहे. तर 9 एप्रिल 2022 मध्ये महाबळेश्वर नानापेठ येथील संतनगरमध्ये घटना घडली होती.
दरम्यान, पुण्यातील पिंपरीमध्ये पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी बाप-मुलावर गुन्हा दाखल केला आहे.
