AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akola : रेल्वेसह खासदारांचं घर बॉम्बने उडविण्याची धमकी, ठाणे पोलिसांनी घेतलं तरूणाला ताब्यात

फोन कॉलच्या तपासावरून आरोपीचा शोध घेण्यात आला. तत्पर्वी मुंबईच्या नियंत्रण कक्ष आणि नागपूर येथील नियंत्रण कक्ष यांनी अकोल्यात रेल्वे व खासदारांच्या घरात बॉम्ब असल्याची दिली होती माहिती.

Akola : रेल्वेसह खासदारांचं घर बॉम्बने उडविण्याची धमकी, ठाणे पोलिसांनी घेतलं तरूणाला ताब्यात
Akola : रेल्वेसह खासदारांचं घर बॉम्बने उडविण्याची धमकी, ठाणे पोलिसांनी घेतलं तरूणाला ताब्यातImage Credit source: tv9marathi
| Edited By: | Updated on: Jul 29, 2022 | 6:56 AM
Share

अकोला – अकोला (Akola) पूर्णा सुपरफास्ट पॅसेंजर रेल्वे (Patna Suvidha Express) आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार संजय धोत्रे (Sanjay Dhotre) यांचे घर बॉम्बने उडवण्याची धमकी फोनवरून मिळाली होती. ही माहिती मंगळवारी रात्री मुंबई येथील नियंत्रण कक्षाकडून नागपूर नियंत्रण कक्षाला व तेथून अकोला पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर अकोला पोलिसांनी तातडीने पावले उचलत अकोला रेल्वे स्थानकावर संपूर्ण यंत्रणेसह शोध मोहीम राबविली. त्यानंतर खासदारांच्या निवासस्थानी तपासणी करून बंदोबस्त वाढविण्यात आला होता. पोलिस तपासात हे कृत्य अकोला येथील मलकापूर परिसरात राहणाऱ्या एका व्यसनाधिन माथेफिरू युवकाचे असल्याचे उघड झाले असून तो ठाणे येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळताच ठाणे पोलिसांनी त्या युवकाला अटक केली आहे.

अशा घटनांमध्ये अनेकदा माथेफिरूकडून प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे

अनेकदा असे प्रकार माथेफिरू यांच्याकडुन करण्यात आले आहेत. सध्या ताब्यात घेण्यात आलेला इसम देखील माथेफिरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच तो व्यसनाधीन देखील आहे. या प्रकरणामुळे पोलिसांची तपास करीत असताना अधिक दमछाक झाली. तर या युवकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांना स्वाधीन केले असून लवकरच त्या आरोपीला अकोल्यात आणण्यात येणार आहे.

असा घेतला आरोपीचा शोध

फोन कॉलच्या तपासावरून आरोपीचा शोध घेण्यात आला. तत्पर्वी मुंबईच्या नियंत्रण कक्ष आणि नागपूर येथील नियंत्रण कक्ष यांनी अकोल्यात रेल्वे व खासदारांच्या घरात बॉम्ब असल्याची दिली होती माहिती. तर नागपूर नियंत्रण कक्षाने ही माहिती अकोला पोलिस अधिक्षक व नियंत्रण कक्षाला दिली. त्यावर हा कॉल कुणी केला होता. कॉल करणाऱ्याचा काय उद्देश होता. याचा तपास सुरू करण्यात आला. सायबर सेलची मदत घेवून फोन करणाऱ्याचा शोध घेतल्यानंतर तो ठाण्यात आल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी 24 तासाच्या आताच संबंधित इसमाला ताब्यात घेतले. तो अकोला शहरातल्या मलकापूर परिसरात राहणारा व्यसनाधिन युवक असून त्याचे नाव नितीन पाटील असल्याचे तपासात उघड झाले. तो मागच्या काही दिवसांपासून ठाणे येथे वास्तव्यास आहे. मागच्या अनेक दिवसांपासून तो घरच्याच्या देखील संपर्कात नसल्याचे तपासात उघड झाले आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.