AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambernath Crime : घरात घुसून जावयाला मारहाण, प्रायव्हेट पार्टवर वार.. तिथे नेमकं काय घडलं ?

शहरात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र भीतीचं आणि दहशतीचं वातावरण आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली इतर दोघे अद्याप फरार आहेत. त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे.

Ambernath Crime : घरात घुसून जावयाला मारहाण, प्रायव्हेट पार्टवर वार.. तिथे नेमकं काय  घडलं ?
| Updated on: Oct 27, 2023 | 11:06 AM
Share

मयुरेश जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, अंबरनाथ | 27 ऑक्टोबर 2023 : नवरा-बायकोच्या वादात इतरांनी न पडलेलंच बरं. नाहीतर त्याचा तमाशा होऊन बसतो. जो काही वाद, भांडण असेल ते आपसात सोडवणं उत्तम. त्यात इतरांची एंट्री झाली की मग वाद चिघळू शकतो आणि होत्याचं नव्हतं. अशाच एका कौटुंबिक वादामुळे तरूणावर हल्ला झाल्याची धक्कादायक ( ambernath crime )घटना उघडकीस आली आहे. बहिणीला नांदवत नसल्याच्या रागातून सासरा आणि मेहुण्याने जावयाच्या घरी जाऊन त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. एवढंच नव्हे तर त्याच्या प्रायव्हेट पार्टवरही वार केल्याने तो गंभीर झाल्याची धक्कादायक घटना घडली.

धक्कादायक गोष्ट म्हणजे या हल्ल्यात पीडित इसमाच्या पत्नीचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. संतप्त पत्नीने तिच्या नातेवाईकांसह मिळून नवऱ्यावरच हल्ला करत त्याला जखमी केले. या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली पण इतर दोन आरोपी अद्याप फरार आहेत. आरोपीवर प्रथम शहरातील स्थानिक रुग्णालयात करण्यात आले. मात्र नंतर त्याला तेथून कळवा येथूल रुग्णालयात रेफर करण्यात आल. सध्या त्याच्यावर तेथे उपचार सुरू आहेत.

नेमकं काय घडलं ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिपीन चौधरी ( वय 34) असे जखमी इसमाचे नाव असून तो अंबरनाथ पश्चिम भागातील कमलाकर नगर परिसरात राहतो. तो एका खाजगी कंपनीत काम करतो. बिपीन याचं लग्न प्रियांका कनोजिया हिच्यासोबत झालं होतं. मात्र लग्नानंतर काही महिन्यांनी त्यांच्यात वाद सुरू झाले आणि ते टोकाला गेले. एकमेकांशी पटत नसल्यानेप्रियांका माहेरी येऊन रहात होती. आपल्या मुलीला तिचा नवरा नांदवत नसल्याचा राग तिच्या कुटुंबियांच्या मनात होता, आणि त्याच रागातून ते बिपीन याला जाब विचारण्यासाठी त्याच्या घरी गेले.

यावेळी प्रियांका, तिचे वडील , तिचा भाऊ आणि काका हे सर्वजण बिपीनच्या घरी पोहोचले. तू आमच्या मुलीला का नांदवत नाही असा जाब त्यांनी बिपीनला विचारला. त्या मुद्यावरून बिपीन आणि त्या सर्वांमध्ये वाद सुरू झाला आणि तो काही वेळात विकोापाला गेला. हळूहळू प्रियांका व तिच्या घरच्यांनी बिपीनला शिवीगाळा करण्यास सुरूवात केली आणि काही वेलातच हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं. त्याच वेळी रागाच्या भरात प्रियांकाचा काका, संताषो याने बिपीनच्या डोक्यात लोखंडी रॉडचा वार केला. तर तिचा भाऊ साहिल याने संतापातच कोयता काढून बिपीनच्या प्रायव्हेट पार्टवर अनेक वार केले.

या दुहेरी हल्ल्यामुळे गंभीर जखमी झालेला बिपीन मदतीसाठी हाका मारू लागला. आजूबाजूच्या लोकांनी त्याच्या घरी धाव घेत हल्ला करणाऱ्यांना रोखलं आणि बिपीनला वाचवलं. त्यानंतर प्रियांका व तिचे कुटुंबीय घटनास्थळावरून फरार झाले. जखमी बीपीन यांला तत्काळ अंबरनाथच्या छाया उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला उल्हासनगर येथील जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयात नेले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला कळवा रुग्णालयात उपचारासाठी रेफर केले. सध्या त्याच्यावर कळवा रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दाखल केला गुन्हा, दोघांना अटक

या जीवघेण्या हल्ल्याची माहिती मिळताच अंबरनाथ पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करून पीडित इसमाच्या तक्रारीनंतर चारही हल्लेखोरांविरोधात भादंवि कलम 307, 326, 324, 506 आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी पीडित इसमाची पत्नी प्रियांका आणि सासरा चिंतामणी या दोघांना तत्काळ अटक केली. पण प्रियांकाचा भाऊ आणि काका हे दोघेही अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन पथके रवाना केली आहेत. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना पोलीस कोठडी ठोठावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.