गर्लफ्रेण्डचीही ‘गर्लफ्रेण्ड’ निघाली, बॉयफ्रेण्ड चवताळला, समलिंगी संबंधातून 29 वर्षीय तरुणीची हत्या

दोघांनी मिळून नियोजन करून महिलेची हत्या केली. तरुणीने हत्येचे सर्व पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. त्याचवेळी पोलिसांसमोर तरुणाने सांगितले की, हत्येनंतर दोघांनी मृत महिलेच्या बेडरुममध्ये शारीरिक संबंध ठेवले.

गर्लफ्रेण्डचीही 'गर्लफ्रेण्ड' निघाली, बॉयफ्रेण्ड चवताळला, समलिंगी संबंधातून 29 वर्षीय तरुणीची हत्या
प्रातिनिधिक फोटो

वॉशिंग्टन : अमेरिकेत एका प्रेमी युगुलाने महिलेची लोखंडी रॉडने मारुन हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी आणखी एक धक्कादायक बाब कबूल केली की, संबंधित महिला जेव्हा अखेरच्या घटका मोजत होती, तेव्हा दोघा आरोपींनी तिच्या बेडरुममध्ये जाऊन शारीरिक संबंध ठेवले. आरोपी महिलेचे मयत महिलेसोबत समलैंगिक संबंध असल्याचं उघडकीस आलं आहे. हद्द म्हणजे, या घटनेनंतर आरोपी युगुलाने मृत महिलेच्या कारसह घरातून अनेक वस्तूही चोरल्या. हे प्रकरण अमेरिकेतील ओक्लाहोमा (Oklahoma) मधील तुलसा (Tulsa) येथील आहे. 4 जानेवारीला महिलेची हत्या झाली होती.

काय आहे प्रकरण?

डेली मेलच्या वृत्तानुसार, मृत्यू झालेल्या महिलेचे वय 29 वर्ष होतं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दाम्पत्याला अटक केली असून, चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. 28 वर्षीय निकोलस जॉन्सन आणि 25 वर्षीय ब्रिनली डेनिसन अशी बॉयफ्रेण्ड-गर्लफ्रेण्डची नावं आहेत. पोलिसांसमोर केलेल्या चौकशीत निकोलसने सांगितले की, तो ब्रिनली डेनिसनसोबत रिलेशनशिपमध्ये होता. पण डेनिसनचे मृत्यू झालेल्या महिलेशीही समलैंगिक संबंध होते.

निकोलसला दोघींमधील समलिंगी संबंध पसंत नव्हते. याच कारणामुळे त्याने तिची हत्या केल्याचा आरोप आहे दोन्ही आरोपींची रवानगी वॉशिंग्टन काउंटी जेलमध्ये करण्यात आली आहे.

हत्येनंतर कारमध्ये झोपलेले युगुल

या प्रकरणी पोलिसांनी चोरीची कार अरकान्सासच्या फेएटविले येथून जप्त केली आहे. या कारमध्ये आरोपी युगुल झोपले होते. पोलिसांनी आरोपी दाम्पत्याची चौकशी केली असता त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. निकोलसने आपल्यासोबत गुन्ह्यात डेनिसनचाही सहभाग असल्याचे कबूल केले.

पुरावे मिटवण्याचा प्रयत्न

दोघांनी मिळून नियोजन करून महिलेची हत्या केली. डेनिसनने हत्येचे सर्व पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. त्याचवेळी पोलिसांसमोर निकोलसने सांगितले की, हत्येनंतर दोघांनी मृत महिलेच्या बेडरुममध्ये शारीरिक संबंध ठेवले. निकोलसने सांगितले की, डेनिसनचे दुसऱ्या महिलेसोबत असलेले नाते त्याला आवडत नसल्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलले.

 

संबंधित बातम्या :

परभणीत कर्ज आणि नापिकीला कंटाळून पत्नीची हत्या आणि पतीची आत्महत्या

धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा बेकायदेशीर गर्भपात; डॉक्टरसह दोघांना अटक

माझी बायको विडी ओढते, मला घटस्फोट मिळवून द्या, नवरा थेट पोलिसात; बायकोने सांगितलं चक्रावणारं कारण

Published On - 8:21 am, Tue, 11 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI