AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इम्रान खान यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी, जाणून घ्या काय आहे प्रकरण ?

एफआयआरमध्ये पाकिस्तान दंड संहितेच्या (पीपीसी) चार कलमांचा समावेश आहे. इम्रान खान यांनी शपथपत्र सादर केल्यानंतर काही तासांतच हे वॉरंट आले.

इम्रान खान यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी, जाणून घ्या काय आहे प्रकरण ?
इम्रान खान यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
Follow us
| Updated on: Oct 01, 2022 | 9:18 PM

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान (Pakistan Ex PM Imran Khan) गेल्या काही दिवसांपासून सतत या ना त्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात अडकलेले दिसतायत. आता पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य (Controversial Statement) केल्याप्रकरणी इमरान खान अडचणीत आले आहेत. इमरान खान यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी (Arrest Warrant Issued Against Imran Khan) करण्यात आले आहे. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जेबा चौधरी यांच्याबद्दल 20 ऑगस्ट रोजी वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल हे वॉरंट जारी केले आहे. इमरान यांना कधीही अटक होऊ शकते.

एफआयआरमध्ये चार कलमांचा समावेश

एफआयआरमध्ये पाकिस्तान दंड संहितेच्या (पीपीसी) चार कलमांचा समावेश आहे. इम्रान खान यांनी शपथपत्र सादर केल्यानंतर काही तासांतच हे वॉरंट आले. इमरान यांनी आपल्या जाहीर सभेत आपली मर्यादा ओलांडल्याचा आरोप या वॉरंटमध्ये करण्यात आला आहे.

इमरान यांच्याविरोधात 506 (गुन्हेगारी धमकीसाठी शिक्षा), 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान), 189 (लोकसेवकाला दुखापत करण्याची धमकी), आणि 188 (लोकसेवकाच्या आदेशाचा अवमान) या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

याआधीही इमरान विरोधात गुन्हे दाखल

इमरान खान यांच्याविरोधात याआधीही अधिकारी आणि न्यायाधीशांना धमकवल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. इस्लामाबादचे सदर दंडाधिकारी अली जावेद यांनी इमरान यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

एका मीडिया रिपोर्टनुसार, भविष्यात कोणत्याही न्यायालयाच्या आणि न्यायव्यवस्थेच्या, विशेषत: कनिष्ठ न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल असे काहीही करणार नाही, असे इम्रान खान यांनी न्यायालयाला आश्वासन दिले.

अजित पवारांनी घेतली कुंडमळा पूल दुर्घटनेतील जखमींची भेट
अजित पवारांनी घेतली कुंडमळा पूल दुर्घटनेतील जखमींची भेट.
सांगलीत कॉंग्रेसला मोठा धक्का! जयश्री पाटील भाजपात प्रवेश करणार
सांगलीत कॉंग्रेसला मोठा धक्का! जयश्री पाटील भाजपात प्रवेश करणार.
व्हायरल झालेल्या आजी-आजोबाशी खास बातचीत
व्हायरल झालेल्या आजी-आजोबाशी खास बातचीत.
नाराजीनाट्यानंतर सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश
नाराजीनाट्यानंतर सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास पवारांचा विरोध; स्पष्टच सांगितल कारण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास पवारांचा विरोध; स्पष्टच सांगितल कारण.
गळा चिरून शेतात फेकलं, 14 वर्षीय मुलाच्या हत्येने जळगाव हादरलं
गळा चिरून शेतात फेकलं, 14 वर्षीय मुलाच्या हत्येने जळगाव हादरलं.
किंचाळ्या, खिडक्यांना लटकलेले विद्यार्थी अन्..
किंचाळ्या, खिडक्यांना लटकलेले विद्यार्थी अन्...
बीडमध्ये झळकले वाल्मिक कराडचे फोटो असलेले बॅनर
बीडमध्ये झळकले वाल्मिक कराडचे फोटो असलेले बॅनर.
लंडनला जाणारी एअर इंडियाची AI-159 फ्लाईट रद्द, प्रवाशांनी व्यक्त केला
लंडनला जाणारी एअर इंडियाची AI-159 फ्लाईट रद्द, प्रवाशांनी व्यक्त केला.
कोचीवरून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं नागपुरात इमर्जन्सी लँडिंग
कोचीवरून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं नागपुरात इमर्जन्सी लँडिंग.