बीडमध्ये प्रेमी युगुलाचा गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न, तरुणाचा मृत्यू तर दोर तुटल्याने महिला बचावली

बीडमध्ये प्रेमी युगुलाचा गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न, तरुणाचा मृत्यू तर दोर तुटल्याने महिला बचावली
प्रातिनिधिक फोटो

दोघांनी सोमवारी खोलीत गळफास लावून घेतला. यावेळी जयपालचा मृत्यू झाला. तर महिलेच्या फासाचा दोर तुटल्याने ती बचावली. याप्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 20, 2022 | 12:59 AM

बीड : प्रेमप्रकरणातून एका प्रेमी युगुलाने गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातील भेंड गावामध्ये घडली आहे. या घटनेमध्ये 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून त्याची प्रेयसी महिला फासाचा दोर तुटल्याने बचावली आहे. याप्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. जयपाल वाव्हळ असे मयत तरुणाचे नाव आहे. (Attempted suicide by strangling a loving couple in beed, youth death, women rescue)

जयपालचे फेसबुकवर विवाहित महिलेशी प्रेमसंबंध जुळले

गेवराई तालुक्यातील भेंड या गावात राहणाऱ्या जयपाल वाव्हळ या 27 वर्षीय तरुणाचे फेसबुकच्या माध्यमातून कल्याण येथे राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले. या प्रेमसंबंधातून संबंधित महिला आपल्या पतीला सोडून दोन दिवसांपूर्वी गेवराईत आपल्या प्रियकराकडे आली होती. यानंतर महिलेच्या प्रेमसंबंधाची माहिती तिच्या पतीला झाली. त्यानंतर महिलेच्या पतीने तिच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती तिला दिली. यामुळे दोघे प्रेमी युगुल घाबरले.

यानंतर भितीपोटी दोघांनी गळफास घेत एकत्र जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोघांनी सोमवारी खोलीत गळफास लावून घेतला. यावेळी जयपालचा मृत्यू झाला. तर महिलेच्या फासाचा दोर तुटल्याने ती बचावली. याप्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

नागपुरात प्रेयसीचा प्रियकरावर चाकूहल्ला

लग्न करण्यावरुन झालेल्या वादातून प्रेयसीने प्रियकरावर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. अक्षय ढोके आणि पूजा गोस्वामी अशी या प्रियकर प्रेयसीची नावे आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून अक्षय आणि पूजाची मैत्री आहे. नंतर या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. पूजाने अक्षयसाठी आपल्या पतीला घटस्फोट दिला होता. अक्षय आणि पूजा लग्नही करणार होते. मात्र काही दिवसांपासून दोघांमध्ये खटके उडत होते. अक्षय लग्न करण्यासाठी टाळाटाळ करीत होता. याच रागातून पूजाने अक्षयच्या रुमवर जाऊन त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात अक्षयच्या हात, मान, पाठ आणि गालावर जखमा झाल्या. त्यानंतर कशीबशी पूजाच्या तावडीतून सुटका करुन घेत तो पळाला. नागरिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी वाडी पोलिसांनी पूजाविरोधात गुन्हा दाखल करीत तिला अटक केली आहे. (Attempted suicide by strangling a loving couple in beed, youth death, women rescue)

इतर बातम्या

तामिळनाडूत सहा महिन्यांच्या गर्भवती शाळकरी मुलीचा मृत्यू, प्राचार्य आणि वसतिगृहाच्या वॉर्डनला अटक

इंदापूरमधील भिशी फसवणूक आकडा तब्बल 200 कोटींवर, शेकडो सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें