Palghar Theft : चोरट्यांची हिंमत तर पहा… पालघरमध्ये चक्क न्यायालयातच चोरीचा प्रयत्न, पत्रे उचकटून खोलीत प्रवेश केला !

चोरट्यांची नजर आता थेट न्यायालयातील महत्त्वाच्या खोल्यांपर्यंत पोहोचल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पालघरमधील अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयातील मुद्देमाल ठेवल्या जाणाऱ्या खोलीत रात्री चोरीचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

Palghar Theft : चोरट्यांची हिंमत तर पहा... पालघरमध्ये चक्क न्यायालयातच चोरीचा प्रयत्न, पत्रे उचकटून खोलीत प्रवेश केला !
पालघरमध्ये चक्क न्यायालयातच चोरीचा प्रयत्न
Image Credit source: TV9
मोहम्मद हुसेन खान

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Aug 18, 2022 | 11:48 PM

पालघर : पालघर न्यायालयातच चक्क चोरट्यांनी चोरी (Theft) करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. भर रात्री चोर पत्रे उचकटून न्यायालया (Court)च्या खोलीत शिरला. न्यायालयाच्या एका खोलीत मुद्देमाल असलेल्या खोलीत चोर शिरला. खोलीत महत्वाच्या वस्तू ठेवलेल्या कपाटाचा कडी कोयंडा तोडला. मात्र कपाटातील एकही वस्तू चोरीला गेली नाही. याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्या (Palghar Police Station)त कलम 454, 457, 380, 511 प्रमाणे अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुठलीही वस्तू चोरीला गेली नसल्याचे प्राथमिक तपासात आढळून आल्याचे पोलीस ठाण्याचे अधिकारी उमेश पाटील यांनी सांगितले.

अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयात मुद्देमाल ठेवल्या जाणाऱ्या खोलीतील कपाट फोडले

चोरट्यांची नजर आता थेट न्यायालयातील महत्त्वाच्या खोल्यांपर्यंत पोहोचल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पालघरमधील अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयातील मुद्देमाल ठेवल्या जाणाऱ्या खोलीत रात्री चोरीचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. पालघर येथील अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयात मुद्देमाल ठेवल्या जाणाऱ्या खोलीच्या वरचे पत्रे उचकून मुद्देमाल असणाऱ्या कपाटाच्या कड्याही तोडण्यात आल्या. मात्र या कपाटातून काहीही चोरीला गेलं नसल्याचं पालघरचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. पालघर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात कलम 454, 457, 380 आणि 511 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरांमध्ये चोरीच्या घटना काही नवीन नाहीत. एटीएम, दुकाने, घरांमध्ये केल्या जाणाऱ्या चोऱ्यांमधील आरोपींना न्यायालयातच शिक्षा दिली जाते. मात्र या चोरट्यांची नजर थेट न्यायालयांपर्यंत पोहोचल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होतंय. पूर्ण प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत. (Attempted theft in the Upper District and Sessions Court at Palghar)

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें