Dombivali Crime : डोंबिवलीत व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणारे दोघे गजाआड, 1 कोटी 60 लाख रुपयांची उलटी जप्त

व्हेल माशाची उलटी ही समुद्रात तरंगणारे सोनं मानलं जातं. सुगंधित उत्पादने तसेच औषध बनवण्यासाठीही याचा उपयोग होतो. यामुळे या उलटीला आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधीची किंमत आहे.

Dombivali Crime : डोंबिवलीत व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणारे दोघे गजाआड, 1 कोटी 60 लाख रुपयांची उलटी जप्त
डोंबिवलीत व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणारे दोघे गजाआडImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 7:18 PM

डोंबिवली : व्हेल माशाची उलटी (Whale Fish Vomit) विक्री करण्यास आलेल्या दोघा तस्करां (Smuggler)ना डोंबिवलीतील रामनगर पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. नंदू राय आणि अर्जुन निर्मल अशी या दोन तस्कराची नावे आहेत. आरोपींकडून पोलिसांनी 1 कोटी 60 लाख रुपये किंतीची 725 ग्राम वजनाची उलटी जप्त केली आहे. या दोघांचा आणखी एक साथीदार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तसेच ही उलटी कोणाकडून आणली आणि कोणाला विकणार होते याचा तपास पोलीस करत आहेत. व्हेल माशाची उलटी ही समुद्रात तरंगणारे सोनं मानलं जातं. सुगंधित उत्पादने तसेच औषध बनवण्यासाठीही याचा उपयोग होतो. यामुळे या उलटीला आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधीची किंमत आहे. त्यामुळे त्याच्या उलटीला फार महत्व असून तिची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जाते.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केले

व्हेल माशाची उलटी विक्री करण्यास डोंबिवलीच्या बंदिश पॅलेस परिसरामध्ये दोन तस्करी येणार असल्याची माहिती कल्याण पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे डोंबिवली पोलीस उपायुक्त पथक व डोंबिवली राम नगर पोलिसांच्या पथकाचे एपीआय गणेश जाधव, बळवंत भराडे, दिनेश सोनवणे, पोलीस हवलदार विशाल वाघ, संजय पाटील, पोलीस नाईक ऋषिकेश भालेराव व इतर इतर कर्मचाऱ्यांनी या परीसरात सापळा रचून दोन जणांना ताब्यात घेतले. आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडून व्हेल माशाची 725 ग्राम वजनाची उलटी आढळून आली. या उलटीची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 1 कोटी 60 लाख रुपये आहे. याप्रकरणी डोंबिवली रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत, नंदू राय आणि अर्जुन निर्मल या दोघांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांचा मुख्य सूत्रधार बाहेर असल्याचे सांगितले. पोलिस त्याचा शोध घेत आहे. (Two arrested for smuggling whale fish vomit in Dombivali)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.