AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : मार खातोय रिक्षावाला! औरंगाबादमधील रिक्षावाल्याला भररस्त्यात कुणी तुडवलं?

आधी रस्त्यावर लोळवलं, तर दे धपाधप धपाधप! औरंगाबाद येथील रिक्षाचालक आणि दुचाकीस्वाराचा व्हिडीओ व्हायरल

Video : मार खातोय रिक्षावाला! औरंगाबादमधील रिक्षावाल्याला भररस्त्यात कुणी तुडवलं?
भर रस्त्यात फ्री स्टाईल हाणामारीImage Credit source: Twitter Video Grab
| Edited By: | Updated on: Dec 05, 2022 | 12:54 PM
Share

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात भररस्त्यात एका रिक्षा चालकाला मारहाण करण्यात आली. एका दुचाकीस्वाराने रिक्षा चालकाला किरकोळ वादातून मारहाण केली. औरंगाबाद शहरातील वरद गणपती मंदिरासमोर ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरुन ही मारहाण करण्यात आली.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक इसम रिक्षा चालकाला बेदम मारहाण करताना दिसताय. यावेळी रिक्षावाल्याला रस्त्यावर लोळवून दुचाकीस्वार तरुण चोप देत होता. ही बाब लक्षात आल्यानं उपस्थितांनी मध्ये पडून हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला.

पण तरिही दुचाकीस्वार तरुणाने संतापाच्या भरात रिक्षा चालकाला मारहाण करणं काही केल्या थांबवलं नाही. लाथाबुक्क्यांनी हा तरुण रिक्षा चालकावर तुटून पडला होता. अखेर रस्त्यावरील इतर लोकांनी तरुणाला रोखण्याचा प्रयत्न केला. या भांडणात दुचाकीस्वार तरुणाचं शर्टाची बटणं देखील तुटली होती.

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तरुणाची दुचाकी रस्त्यावर पडल्याचंही दिसून आलं आहे. रिक्षाचा दुचाकीला धक्का लागून तरुण दुचाकीवरुन खाली पडला असावा आणि त्यामुळे संतापलेल्या तरुणाने दुचाकी स्वाराला मारहाण करण्यास सुरुवात केली असावी, अशी शंका उपस्थित केली जातेय. या घटनेप्रकरणी अद्याप कोणतीही पोलीस तक्रार झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

पाहा व्हिडीओ :

महत्त्वाचं म्हणजे औरंगाबाद येथे भररस्त्यात मारहाणीच्या घटना घडलं काही नवं नाही. याआधीही अनेकही मारहाणीच्या घटना औरंगाबादेत घडलेल्या आहेत. त्याचे व्हिडीओ समोर आलेले आहेत. वारंवार औरंगाबादेत भररस्त्यात वाद होऊन मारामाऱ्या होण्याचे वाढणारे प्रकार चिंताजनक आहे. अशा घटना रोखण्याचं आव्हानंही पोलिसांसमोर आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.