शेंदूर लावलेले दोन दगड, त्याखाली सांगाडा, स्वयंपाक घरात आढललेल्या मृतदेहाचं गूढ उकललं, काळजात चर्र करणारी घटना

भुईगड हे आपली पत्नी आणि दोन मुलींसह राहत होते. तीन महिन्यांपूर्वी नवरात्रीसाठी भुईगड येथे जात असल्याचे त्यांनी घरमालकाला सांगितले.

शेंदूर लावलेले दोन दगड, त्याखाली सांगाडा, स्वयंपाक घरात आढललेल्या मृतदेहाचं गूढ उकललं, काळजात चर्र करणारी घटना
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 16, 2022 | 9:02 AM

औरंगाबादः शेंदूर लावलेल्या दोन दगडांखाली मानवी सांगाडा आढळून आल्यानंतर औरंगाबादमध्ये (Aurangabad) खळबळ माजली होती. हा सांगाडा पुरुषाचा आहे की महिलेचा याचा तपास सुरु होता. अखेर या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. हा नरबळीचा प्रकार नाही ना, असा संशय पोलिसांना (Police) येत होता. मात्र पत्नीच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने पतीने तिला अशा प्रकारे पुरून ठेवल्याचं उघड झालंय.

काय आहे नेमकं प्रकरण?

वाळूजच्या समता कॉलनी परिसरात सूर्यकांत गोरखनाथ शेळके यांचे दोन मजली घर आहे. तळमजल्यावरील दोन खोल्या काकासाहेब भूईगड यांना भाड्याने देण्यात आल्या होत्या.

भुईगड हे आपली पत्नी आणि दोन मुलींसह राहत होते. तीन महिन्यांपूर्वी नवरात्रीसाठी भुईगड येथे जात असल्याचे त्यांनी घरमालकाला सांगितले.

शेळके यांनी भाडे देण्यासाठी अनेकवेळा भुईगड यांना फोन लावला. ते गावाहून परत कधी येणार हेही विचारले. पण त्यांनी काहीच उत्तर दिले नव्हते.

तीन महिने घर बंदच असल्याचं परिसरातील नागरिकांनी सांगितलं अखेर शेळके यांनीच घरी येऊन कुलूप तोडले.

दार उघडताच चित्र पाहून सारे हादरले. स्वयंपाक घरात ओट्याखाली वाळू, बांधकाम केलेलं दिसलं. तेथे शेंदूर लावलेले दोन दगड आणि लिंबू-मिरची ठेवण्यात आले होते.

या प्रकरणाची पोलिसात तक्रार देण्यात आली. स्वयंपाक घरातल्या त्या जागेत मानवी सांगाडा आढळून आला.

ही घटना ऐकून औरंगाबादमध्ये खळबळ माजली होती. अखेर पोलिसांनी सदर प्रकरणाचा खुलासा केला. आजारपणात पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्यामुळे पतीनेच सासूच्या मदतीने पत्नीचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला असल्याचे समोर आले आहे. वाळूज पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून हा खुलासा केला.

मयत महिलेच्या पतीला ताब्यात घेतल्यानंतर पतीनेच ही कबुली दिली आहे…

का पुरला मृतदेह?

काकासाहेब भुईगड असं पत्नीचा मृतदेह पुरणाऱ्या पतीचे नाव आहे, तर अनिता भुईगड असं या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्यामुळे मृतदेह स्वयंपाक घरात पुरावा लागण्याची दुर्दैवी वेळ या कुटुंबावर आली होती. त्यामुळे मृत्यूही आता महाग होत चालला आहे का? असा सवाल उपस्थित होतोय.

Non Stop LIVE Update
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर.
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल.
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल.
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ....
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.