विश्वासाने घरी नेलं, सेक्ससाठी बायकोची मागणी करताच नको ते घडलं
मनीकांताची बहिण घरी आली, तिने पाहिलं की, भावाच्या नाकातून रक्त येतय. रात्री उशिरा मनीकांताला व्हिक्टोरिया रुग्णालयात नेण्यात आलं. कवटीकडच्या त्याच्या भागाला मार लागला होता.

बंगळुरु : दक्षिण बंगळुरुत जयानगरमध्ये एक 43 वर्षीय व्यक्तीचा मागच्या आठवड्यात मृत्यू झाला होता. सिद्दापूरा पोलिसांच्या तपासात हा मृत्यू नैसर्गिक नसून हत्या असल्याच स्पष्ट झालय. केएम कॉलनीमध्ये राहणाऱ्या सुरेशला (45) पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर शेजारी राहणाऱ्या मनीकांताची हत्या केल्याचा आरोप आहे. दोघेरी मजुरीचे काम करायचे. मनीकांताच्या बहिणीने केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी सुरेशला अटक केली. तिनेच या हत्या प्रकरणात सुरेशचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश आणि मनीकांता एकाच लेनमध्ये रहायचे. पण दोघे परस्परांना ओळखत नव्हते. 8 मार्चच्या सकाळी सुरेश मनीकांताच्या घरी गेला. त्याच्या आईला सांगितलं की, तुमचा मुलगा माझ्या घराजवळ झोपलाय. मनीकांता सलग तीन दिवस दारु पीत होता. मनीकांताची आई त्याला घरी घेऊन आली. तिला वाटलं की, मुलगा नशेमध्ये आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.
रक्त येत असल्याच तिने पाहिलं
मनीकांताची बहिण घरी आली, तिने पाहिलं की, भावाच्या नाकातून रक्त येतय. रात्री उशिरा मनीकांताला व्हिक्टोरिया रुग्णालयात नेण्यात आलं. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. गुरुवारी मनीकांताच्या बहिणीने पोलिसात तक्रार नोंदवली. शवविच्छेदन अहवालातून मनीकांताला मार लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याच स्पष्ट झालं. कवटीकडच्या त्याच्या भागाला मार लागला होता, असं पोलिसांनी सांगितलं.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसलं?
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं, त्यावेळी सुरेश मनीकांताला खेचून रस्त्यावर आणत असल्याच दिसलं. पोलिसांनी सुरेशला ताब्यात घेतलं, त्यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
सेक्सची व्यक्त केली इच्छा
7 मार्चला सुरेश आणि मनीकांता एकत्र दारु प्यायले. रस्त्यावर बोलत होते. त्यानंतर दोघे सुरेशच्या घरी गेले. त्यावेळी मनीकांताने सेक्सची इच्छा व्यक्त केली. त्याने सुरेशला पत्नीला सेक्स करण्यासाठी पाठवं असं सांगितलं. त्यावरुन दोघांमध्ये भांडण झालं. त्या आघाताने बेशुद्ध पडला
सुरेशने संतापाच्या भरात मनीकांताच्या डोक्यावर लाकडी वस्तूने प्रहार केला. मनीकांता त्या आघाताने बेशुद्ध पडला. त्यानंतर सुरेशने मनीकांताला घराच्या बाहेर आणून टाकलं. जेणेकरुन तो झोपलाय असं सगळयांना वाटावं.
