AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाटलीचं बूच आणि चप्पलने लागला खूनाचा छडा, जी धायमोकलून रडत होती, तिच निघाली खूनी… थरकाप उडवणाऱ्या हत्याकांडाने सर्वच चक्रावले

एका मोठ्या हत्याकांडाचा छडा पोलिसांनी लावला आहे. पोलिसांनी केलेल्या खुलाशानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. लोकेश कुमार याच्या पत्नीनेच सर्वकाही कट आखल्याचे स्पष्ट झाले. पतीला आपल्या अफेअरची कुणकुण लागल्याचे कळताच तिने हे धक्कादायक पाऊस उचलले.

बाटलीचं बूच आणि चप्पलने लागला खूनाचा छडा, जी धायमोकलून रडत होती, तिच निघाली खूनी... थरकाप उडवणाऱ्या हत्याकांडाने सर्वच चक्रावले
bengaluru murder case
| Edited By: | Updated on: Jul 26, 2025 | 4:23 PM
Share

पोलिसांनी एक मोठा कट उधळून लावलाय. एका पुरूषाचा मृत्यू आत्महत्या म्हणून दाखवण्यात आला होता, पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेने संपूर्ण कट उघडकीस आणला. पत्नीनेच पतीला जबरदस्तीने विष पाजून मारले आणि मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकला असल्याचे स्पष्ट झाले. सुरुवातीला घटनास्थळ आणि मृत व्यक्तीची पत्नी ज्यापद्धतीने रडत होती, त्यावरून ही आत्महत्या असल्याचे वाटत होते. सर्वांना वाटले की या व्यक्तीने आत्महत्या केली आहे. त्याचा मृतदेह रस्त्यावर पडला होता, जवळच विषाची एक रिकामी बाटली होती. यासोबतच मृतदेहापासून काही अंतरावर त्याची गाडी मिळाली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्यावेळी पोलिसांनी बारकारईने सर्वकाही घटनास्थळी बघितले, त्यानंतर सत्य बाहेर आले. पोलिसांना समजले की, ही आत्महत्या नाही तर सुनियोजित हत्येचा कट आहे. ही घटना बेंगळुरूमधील आहे. ही घटना बेंगळुरूच्या जवळील कानवा धरण परिसरातील आहे. पोलिसांना निर्जन ठिकाणी एका पुरूषाचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. यासोबतच त्याच्या शेजारी रिकामी विषची बाटली पडली होती आणि त्याची गाडीही काही अंतरावर उभी होती. घटनास्थळी पोहोचलेली पत्नी मोठ्याने ओरडू ओरडू रडत होती.

जर या माणसाने विष प्राशन करून आत्महत्या केली असेल तर विषाच्या बाटलीचे टोपण कुठे आहे? बाटली आहे पण टोपण कुठे? यासोबतच मृत व्यक्तीच्या पायात एकच चप्पल असल्याने निरीक्षक बीके प्रकाश आणि उपनिरीक्षक सहाना पाटील यांना संशय आला. डेप्युटी एसपी केसी गिरी यांना देखील घटनास्थळी जसे दाखवले जात आहे, तसे काही घडलेच नसल्याचा संशय आला. एखादा व्यक्ती आत्महत्या करत असेल तर तो एकच चप्पल का घालेल पायात असाही प्रश्न यावेळी पडला.

मृतदेह सापडलेल्या व्यक्तीचे नाव लोकेश कुमार (वय 45) असून त्याच्या पत्नीचे नाव चंद्रकला आहे. या घटनेनंतर लोकेशच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले की, त्याच्या पत्नीचे दुसऱ्या एका व्यक्तीसोबत अफेअर सुरू होते आणि याबद्दल काही दिवसांपूर्वीच लोकेशला समजले. यानंतर पोलिसांच्या तपासाची संपूर्ण दिशाच बदलून गेली. चन्नपटना सरकारी रुग्णालयाच्या अहवालात लोकेशचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचे म्हटले होते. पण डॉक्टरांनी त्याच्या शरीरावर असंख्य जमखा असल्याचेही नमूद केले. यानंतर पोलिसांनी चाैकशी करताच चंद्रकला हिनेच पती लोकेश कुमारही हत्या प्रियकरासोबत मिळून केल्याचे स्पष्ट झाले.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.