‘सिंघम 2’ फेम नायजेरियन अभिनेत्याला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक

माल्विनने विश्वरुपम, सिंघम, अॅना बॉण्ड, दिलवाले, जांबू सवारी आणि परमात्मा यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने तीन नॉलिवूड (नायजेरियन) चित्रपटांमध्ये भूमिका देखील केल्या आहेत.

'सिंघम 2' फेम नायजेरियन अभिनेत्याला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक
नायजेरियन अभिनेत्याला अटक

बंगळुरु : बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकलेल्या एका नायजेरियन अभिनेत्याला बंगळुरु पोलिसांनी बुधवारी ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली अटक केली. बंगळुरुतून चेकुमे माल्विन (Chekwume Malvin) याने ‘सिंघम 2’सह जवळपास 20 हिंदी, कन्नड आणि तामिळ चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

कोण आहे चेकुमे माल्विन

बंगळुरु पूर्व विभाग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माल्विन हा वैद्यकीय व्हिसा अंतर्गत भारतात आला आहे. त्याने मुंबईतील न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीमध्ये दोन महिन्यांचे प्रशिक्षणही घेतले होते. माल्विनने विश्वरुपम, सिंघम, अॅना बॉण्ड, दिलवाले, जांबू सवारी आणि परमात्मा यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने तीन नॉलिवूड (नायजेरियन) चित्रपटांमध्ये भूमिका देखील केल्या आहेत.

कॉलेज विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकल्याचा आरोप

पूर्व बंगळुरुतील एचबीआर लेआऊटमधील एका इमारतीमधून पोलिसांनी माल्विनला अटक केली. “आरोपींने प्रामुख्याने महाविद्यालयीन विद्यार्थी आणि व्यावसायिकांना ड्रग्ज विकले” असं पूर्व विभागाचे डीसीपी एसडी शरणप्पा म्हणाले.

काय काय जप्त?

पोलिसांनी आरोपीकडून 15 ग्रॅम एमडीएमए, 7 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 250 मिली हॅश ऑईल, मोबाईल फोन, 2500 रुपये रोख आणि 8 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. माल्विनवर नार्कोटिक्स ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक पदार्थ अधिनियम, 1985 च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॉटेल संचालक कुणाल जानीला अटक

दुसरीकडे,  वांद्रे येथील एका मोठ्या हॉटेलचा संचालक कुणाल जानी (Kunal Jani) याला एनसीबीने अखेर अटक केली आहे. हॉटेल संचालक कुणाल जानी हा दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचा मित्र होता. एनसीबीचे (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी कुणाल याला अटक केली आहे. ही अटक बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन (Bollywood Drugs connection) प्रकरणात करण्यात आली आहे.

कुणाल जानी याला गुन्हा क्रमांक 24/2020 मध्ये अटक करण्यात आली आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर कुणाल हा 24/2020 क्रमांकाच्या गुन्ह्यात फरार होता. अखेर त्याला काल (29 सप्टेंबर) खार भागातून अटक करण्यात एनसीबीला यश आले आहे.

बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणी तपासणी करताना बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन समोर आले. यावेळी वांद्रे येथील रेस्टॉरंटचे संचालक कुणाल जानी याचीही या प्रकरणी चौकशी करण्यात आली होती. माध्यमांच्या अहवालानुसार कुणाल जानी हा त्या व्हॉट्सअॅप ग्रुपचा एक भाग होता, ज्यात रिया चक्रवर्ती देखील सहभागी होती. ईडीला रियाच्या फोनवर चॅट देखील सापडले होते, ज्यामध्ये कुणाल सहभागी होता. या चॅटमध्ये दोघेही चरस आणि डूबीज या ड्रग्जबद्दल बोलत आहेत. या ग्रुपमध्ये रिया आणि सॅम्युअल ड्रग्जबद्दल बोलताना आढळले. यावेळी ईडीनेही कुणालची 6 तास चौकशी केली होती. मात्र, यानंतर तो फरार झाला होता.

संबंधित बातम्या :

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी होता फरार, सुशांत सिंह राजपूतचा मित्र कुणाल जानीला अखेर अटक!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI