Yoga Guru Arrested : योग शिकायला येणाऱ्या महिलांवर योग गुरुचीच वाईट नजर पडली, मग…17 वर्षाच्या मुलीने हिम्मत दाखवली, सत्य बाहेर आल्यानंतर सगळेच हादरले
Yoga Guru Arrested :योग गुरु निरंजन मूर्तीच धक्कादायक कांड समोर आलय. योगासन शिकायला येणाऱ्या महिलांवर त्यांची वाईट नजर असायची. त्याने योग शिकायला येणाऱ्य़ा महिलांनाच टार्गेट केलं. एका 17 वर्षीय मुलीने हिम्मत दाखवल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

कर्नाटकच्या बंगळुरुमध्ये एक हैराण करुन सोडणारं प्रकरण समोर आलय. इथे एका योग गुरुवर अल्पवयीन मुलीसह 8 महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप झाला आहे. एक पीडित अल्पवयीन मुलीने योग गुरु निरंजन मूर्ती विरोधात राजराजेश्वरी नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. आरोपी योग गुरुला अटक झाली आहे. प्रकरणात पुढील चौकशी सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, योग गुरु निरंजन मूर्ती राजराजेश्वरी नगरात एक योग केंद्र चालवायचा. योग गुरु निरंजन मूर्तीवर योग केंद्रात येणाऱ्या आठ महिला यात युवती सुद्धा आहेत, त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
मेडीकल नंतर बलात्कार झाल्याच स्पष्ट
एका अल्पवयीन मुलीसोबत योग गुरुने हे कृत्य केल्यानंतर तो चर्चेत आला. मुलीने थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी तिची मेडीकल केल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याच स्पष्ट झालं. त्यानंतर त्यांनी योग गुरु निरंजन मूर्तीला अटक केली. मुली्च्या तक्रारीवरुन पॉक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
आपल्या वासनेच शिकार बनवलं
पोलिसांनी सांगितलं की, गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी आता त्याला शोधून अटक केली आहे. चौकशीत समजलं की, त्याने मुलीवर बलात्कार केला. माहिती मिळालीय की, आरोपीने अन्य निरपराध मुली आणि महिलांना सुद्धा आपल्या वासनेच शिकार बनवलं. पुढील तपास सुरु आहे. पोलिसांनी निर्देश दिलेत की, या योग गुरुने अन्य कोणाच लैंगिक शोषण किंवा बलात्कार केला असेल, तर त्यांनी राजेश्वरी नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. तक्रारकर्त्याची माहिती गोपनीय ठेवली जाईल.
लेक्चररचा विद्यार्थीनीवर बलात्कार
दोन महिन्यांपूर्वी बंगळुरुत एका कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या लेक्चररने मित्रांसोबत मिळून एका विद्यार्थीनीवर वारंवार बलात्कार केलेला. पीडितेच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा नोंदवून फिजिक्स आणि बायोलॉजीच्या लेक्चररसह त्याच्या मित्राला अटक केली. नरेंद्र फिजिक्सचा लेक्चरर आहे,संदीप बायोलॉजीचा आणि अनूप अशी तिघांची ओळख पटवण्यात आली आहे. हे तिघे प्रायवेट कॉलेजमध्ये नोकरी करायचे, जिथे विद्यार्थिनी शिकायची.
