स्वयंपाक्याकडून विश्वासघात, महिला IPS अधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न

आरोपी हा आयपीएस अधिकाऱ्याकडे अनेक वर्षांपासून स्वयंपाकी म्हणून काम करत असल्याची माहिती आहे. अगदी पीडित मुलीच्या जन्माच्याही आधीपासून तो त्यांच्याकडे काम करत होता.

स्वयंपाक्याकडून विश्वासघात, महिला IPS अधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Sep 08, 2021 | 12:17 PM

पाटणा : बिहारमध्ये एका कुकने वरिष्ठ महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. आयपीएस अधिकारी आणि तिचा पती काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते, ही संधी साधून 50 वर्षीय स्वयंपाकीने 10 वर्षीय मुलीच्या बेडरुममध्ये प्रवेश केला आणि खोलीचा दरवाजा आतून बंद केला होता. पीडित मुलीच्या जन्माआधीपासून स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या आरोपीवर कुटुंबाचा आंधळा विश्वास होता, मात्र त्याच्या विकृत मनोवृत्तीमुळे त्याला तडा गेला.

नेमकं काय घडलं?

पीडितेच्या आरोपांनुसार, कुक बेडवर बसला आणि वाईट हेतूने त्याने 10 वर्षांच्या मुलीचे पाय दाबण्यास सुरुवात केली. ज्यावर मुलीने आक्षेप घेतला. त्यामुळे स्वयंपाकी खोलीबाहेर पडला आणि मुलीला गप्प करण्यासाठी त्याने 200 रुपये किमतीची चॉकलेट आणून दिली.

पीडितेच्या तक्रारीनंतर स्वयंपाक्याला अटक

मुलीने त्याला कसंबसं पिटाळलं आणि तिच्या आयपीएस आईला फोन केला, पण त्यावेळी आईने फोन उचलला नव्हता. थोड्या वेळाने दाम्पत्य घरी पोहचले आणि त्यांनी मुलीकडून ही घटना ऐकली, तेव्हा त्यांचा स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता. पीडितेच्या तक्रारीनंतर स्वयंपाक्याला अटक करण्यात आली आहे. बलात्काराच्या प्रयत्नासह आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेच्या जन्माआधीपासून नोकरीला

आरोपी हा आयपीएस अधिकाऱ्याकडे अनेक वर्षांपासून स्वयंपाकी म्हणून काम करत असल्याची माहिती आहे. अगदी पीडित मुलीच्या जन्माच्याही आधीपासून तो त्यांच्याकडे काम करत होता. त्याने मुलीला आपल्या मांडीवर जेवणही भरवले होते. मात्र आता तो तिच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करत होता.

कुटुंबाचा विश्वासघात

महिला पोलीस अधिकारी किशोरी सहचारी यांनी सांगितले की, आयपीएस अधिकारी तिच्या स्वयंपाकीवर खूप विश्वास ठेवत असत, ती स्वयंपाक्याच्या दोन्ही मुलींच्या लग्नासाठी त्याच्या गावीही गेली होती, पण त्याने तिचा विश्वासघात केला.

मुंबईत अल्पवयीन मुलीवर इन्स्टाग्राम फ्रेण्ड्सचा बलात्कार

दुसरीकडे, मुंबईत एका अल्पवयीन मुलीवर एकाच रात्री तीन वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना काही महिन्यांपूर्वी उघडकीस आली होती. इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या मुलीच्या एका मित्राने वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. त्याने या पार्टीसाठी मुलीलादेखील बोलावलं होतं. ते सर्व मढ परिसरातील हॉटेलबाहेर भेटले. त्यांनी तिथे वाढदिवस साजरा केला. ते त्या ठिकाणी गाडीतून पोहोचले होते. त्यांनी केक कारमध्ये ठेवून वाढदिवस साजरा केला.

वाढदिवस साजरा केल्यानंतर मुलीच्या दोन इन्स्टाग्राम मित्रांनी गाडीच्या आत नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ती जागा सोडल्यानंतर मुलगी मालाड भागातील एका मित्राच्या घरी गेली. पण तिथे त्या मित्रानेही तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर मुलगी तिथल्या घरातून कसंबसं बाहेर पडली. ती दुसर्‍या मित्राच्या घरी गेली. तिथे त्याही मित्राने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप झाला होता.

संबंधित बातम्या :

दहावीच्या अभ्यासात मदतीचा बहाणा, नवी मुंबईत 17 वर्षांच्या चुलत भावाकडून बलात्कार, पीडिता गर्भवती

इन्स्टाग्रामवर मैत्री, वाढदिवसाच्या पार्टीसाठी बोलावलं, अल्पवयीन मुलीवर एकाच रात्री तीन ठिकाणी सामूहिक बलात्कार

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.