रात्री नवरा अचानक घरी, पत्नी प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत, एकही शब्द न बोलता नवऱ्याने…

रात्री नवरा अचानक घरी, पत्नी प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत, एकही शब्द न बोलता नवऱ्याने...
प्रातिनिधिक छायाचित्र.

रोहित बेपत्ता झाल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी विशेष पथक तयार केले होते. फोन कॉलद्वारे पोलिसांना कळले की रोहितचे पिंकी देवीशी शेवटचे बोलणे झाले होते. पोलिसांनी लगेच पिंकी देवीला चौकशीसाठी बोलावले. त्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Jan 07, 2022 | 10:22 AM

पाटणा : अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार बिहारच्या लखीसराय येथे समोर आला आहे. नवरा कामानिमित्त परगावी असताना विवाहितेचे अन्य पुरुषासोबत प्रेमसंबंध जुळले. एके रात्री अचानक घरी आलेल्या पतीने पत्नीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. त्यानंतर घडलेल्या घटना वाचून कोणाच्याही अंगाचा थरकाप उडेल.

काय आहे प्रकरण?

लखीसराय जिल्ह्यातील मेदनीचौक पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या ऋषी पहारपूर गावात ही घटना घडली. काही दिवसांपूर्वी गावातून रोहित नावाचा तरुण बेपत्ता झाला होता. त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. बुधवारी रोहितचा मृतदेह नदीत सापडला. मृतदेह नदीच्या पाण्यातून बाहेर काढत पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि या प्रकरणाचा तपास सुरु केला. त्यानंतर रोहितचे गावातीलच एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे समोर आले.

पत्नीला आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहाथ पकडले

पोलिसांनी सांगितले की, आरोपी पूरण पासवान हा पाटणा येथे गवंडी होता. कामाच्या निमित्ताने तो जास्त वेळ घराबाहेर राहत असे. या काळात त्याच्या पत्नीचे गावातील रोहित यादव नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध जुळले. 31 डिसेंबरच्या रात्री उशिरा पूरण पासवान अचानक पाटण्याहून परत आला. यावेळी त्याने पत्नीला रोहितसोबत आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहाथ पकडले. पासवान पत्नीला काहीच बोलला नाही. पण त्याने रोहित यादवच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले. हत्येनंतर त्याने रोहितचा मृतदेह नदीत फेकून दिला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने आरोपीच्या पत्नीलाही साथ दिली.

रोहित बेपत्ता झाल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी विशेष पथक तयार केले होते. फोन कॉलद्वारे पोलिसांना कळले की रोहितचे पिंकी देवीशी शेवटचे बोलणे झाले होते. पोलिसांनी लगेच पिंकी देवीला चौकशीसाठी बोलावले. त्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.

आरोपी दाम्पत्याला अटक

पिंकी देवीच्या सांगण्यावरून पोलिसांनी पूरण पासवानला पाटणा येथून अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूरण पासवान आणि पिंकी देवी यांनी मिळून रोहित यादवची हत्या केली. त्यानंतर मृतदेह नदीत फेकून दिला होता. रोहित 31 डिसेंबरला बेपत्ता झाला होता, तर तीन जानेवारीला तो बेपत्ता असल्याप्रकणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपीच्या सांगण्यावरून पोलिसांनी एसडीआरएफ टीमच्या मदतीने रोहितचा मृतदेह नदीतून बाहेर काढला. एसडीसीओ रंजन कुमार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हत्या अनैतिक संबंधातून करण्यात आली आहे. पिंकी देवीचे यापूर्वीही अनेक तरुणांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप झाला होता. सध्या पोलिसांनी आरोपींना अटक करुन तुरुंगात पाठवले आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

16 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या, सोलापुरात नराधम बापाला अटक, आईचीही साथ

दोन लग्नं मोडली, आता लिव्ह इन पार्टनरने घात केला, मुंबईत 29 वर्षीय महिलेची हत्या, 42 वर्षीय बॉयफ्रेण्डला अटक

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें