निवृत्त रेल्वे अभियंत्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले, राहत्या घरात गळा दाबून झालेली हत्या

अटक केलेल्या दरोडेखोरांकडून पोलिसांनी चोरीच्या दोन बाईक, टीव्ही, 25 हजार रुपयांची रोकड आणि तीन चोरीचे मोबाईलही जप्त केले आहेत. 1 जुलै रोजी 6-7 दरोडेखोरांनी निवृत्त अभियंत्याची पत्नी लीला चौधरी यांचा गळा दाबून खून केला होता.

निवृत्त रेल्वे अभियंत्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले, राहत्या घरात गळा दाबून झालेली हत्या
निवृत्त रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीचे हत्या प्रकरण

पाटणा : निवृत्त रेल्वे अभियंत्याच्या पत्नीच्या हत्या प्रकरणाचे गूढ उकलण्यात पोलिसांना जवळपास दोन महिन्यांनी यश आलं आहे. लुटीच्या उद्देशाने वृद्ध महिलेची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. बिहारची राजधानी पाटणा शहरातील नाडी पोलीस स्टेशन परिसरातील सबलपूर त्रिवेणी घाट येथे 1 जुलै 2020 रोजी हा प्रकार घडला होता. PWI च्या निवृत्त रेल्वे अभियंत्याची पत्नी घरात एकटीच असताना तिची हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर चार दिवसांनी महिलेचा मृतदेह राहत्या घरी सापडला होता. पोलिसांनी दरोडेखोर टोळीच्या चार सदस्यांना अटक केली आहे, तर दोन दरोडेखोर फरार असल्याची माहिती आहे.

काय आहे प्रकरण?

अटक केलेल्या दरोडेखोरांकडून पोलिसांनी चोरीच्या दोन बाईक, टीव्ही, 25 हजार रुपयांची रोकड आणि तीन चोरीचे मोबाईलही जप्त केले आहेत. 1 जुलै रोजी 6-7 दरोडेखोरांनी निवृत्त अभियंत्याची पत्नी लीला चौधरी यांचा गळा दाबून खून केला होता. नंतर दरोडेखोरांनी घरात ठेवलेले दागिने, टीव्ही, मोबाईल, 25 हजार रुपयांची रोख रक्कम आणि इतर वस्तू लुटून पळ काढला होता. लीला चौधरी घरात एकट्याच असताना ही घटना घडली होती. चार दिवसांनंतर, घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती स्थानिकांनी दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महिलेचा मृतदेह नालंदा वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठवला होता.

चौघा दरोडेखोरांना अटक

तपासात पोलिसांना समजले की लीला चौधरींची हत्या दरोड्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. पोलिसांनी मोबाईल सीडीआरच्या आधारे दीपक कुमार नावाच्या दरोडेखोरला अटक केली आणि त्याच्या माहितीवरून रोहित डोम, रोशन कुमार आणि राजन साहनी या हत्या आणि दरोडा प्रकरणातील इतर तीन जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. फतुहा एसडीपीओ राजेशकुमार मांझी यांनी सांगितलं, की सुरुवातीला हे संपूर्ण प्रकरण अनाकलनीय होतं, परंतु पोलिसांच्या तपासामुळे संपूर्ण घटना उघडकीस आली.

चोरीचा माल जप्त करण्याचेही प्रयत्न

फतुहा डीएसपींनी फरार असलेले दोन आरोपी, छेडी उर्फ ​​रोशन पासवान आणि छोटू पासवान यांना लवकरच अटक करण्याचे आश्वासन दिले आहे, तर चोरीचा माल खरेदी करणाऱ्या दुकानदाराला पकडण्यासाठीही पोलिसांची छापेमारी सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. फातुहा डीएसपींनी सांगितले की लीला चौधरींच्या जवळ राहणाऱ्या दीपक साहनी, रोहित डोम आणि रोशन कुमार यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह हा खून केला होता.

संबंधित बातम्या :

वृद्ध दाम्पत्याच्या घरावर दरोडा, निघताना पाया पडून चोरांनी 500 ​​रुपये दिले, म्हणाले सहा महिन्यांत सगळा ऐवज परत करु

दुकानासमोर भिकारी बनून रेकी, नंतर दरोडा, देशभरात धुमाकूळ माजवणारी टोळी नालासोपाऱ्यात जेरबंद

CCTV VIDEO | लोणवळ्यात डॉक्टरांच्या घरात सशस्त्र दरोडा, दाम्पत्याला बांधून 66 लाखांची लूट

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI