फेसबुक लाईव्हमध्ये मित्रांना म्हणाला ‘प्रेम-बिम सोडा’, प्रेयसीला म्हणाला ‘मी गेल्यावर संसार कर’, नंतर घेतला गळफास

आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने फेसबुक लाईव्ह करत 'प्रेम-बिम सोडा आणि करिअरवर लक्ष केंद्रित करा' असा सल्ला मित्रांना दिला. 'तुझी तब्येत बरी नसते, गरम पाण्यासोबत पोटदुखीचं औषध घेत रहा. मी गेल्यावर संसार कर' असा सल्लाही त्याने प्रेयसीला दिला.

फेसबुक लाईव्हमध्ये मित्रांना म्हणाला 'प्रेम-बिम सोडा', प्रेयसीला म्हणाला 'मी गेल्यावर संसार कर', नंतर घेतला गळफास
पाणीपुरीवरुन पती-पत्नीमध्ये क्षुल्लक वाद; पत्नीचे टोकाचं पाऊल, विष प्राशन करुन आत्महत्या

पाटणा : प्रेयसीने भेटण्यास नकार दिल्याने उत्तर प्रदेशच्या तरुणाने बिहारमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फेसबुक लाईव्ह करुन तरुणाने आधी आपबिती सांगितली. त्यानंतर आपल्या मित्रांना आणि प्रेयसीलाही काही सल्ले दिले. अखेर पाटणा शहरातील बाल लीला गुरुद्वाराजवळ असलेल्या एनआरआय गेस्ट हाऊसमध्ये गळफास घेत त्याने आत्महत्या केली.

काय आहे प्रकरण?

आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने फेसबुक लाईव्ह करत ‘प्रेम-बिम सोडा आणि करिअरवर लक्ष केंद्रित करा’ असा सल्ला मित्रांना दिला. ‘तुझी तब्येत बरी नसते, गरम पाण्यासोबत पोटदुखीचं औषध घेत रहा. मी गेल्यावर संसार कर’ असा सल्लाही त्याने प्रेयसीला दिला. आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तो दिल्लीहून पाटणा येथे आला होता. मात्र तिने भेटण्यास नकार दिला, तेव्हा त्याने मृत्यूला कवटाळण्याचा निर्णय घेतला.

प्रेयसीला भेटण्यासाठी पाटणा गाठलं

बाल लीला गुरुद्वारा अंतर्गत एनआरआय इमारतीच्या खोली क्रमांक 107 मध्ये आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव सरदार परमजीत सिंह असून तो उत्तर प्रदेशातील शामली येथील रहिवासी आहे. त्याची प्रेयसी पाटणा साहिबमध्ये असल्याची माहिती मिळताच तो रविवारी सकाळी 11 वाजता पाटणा साहिबला आला. दिवसभर त्याने तरुणीला भेटण्याचा प्रयत्नही केला. मात्र प्रेयसीने एका व्यक्तीच्या माध्यमातून त्याला मेसेज पाठवला की तिला त्याच्याशी कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत, त्यानंतर परमजीतला मनस्ताप झाला आणि त्याने मृत्यूला आलिंगन देण्याचा निर्णय घेतला.

सहा मिनिटांचे फेसबुक लाईव्ह

परमजीतने मृत्यूपूर्वी सहा मिनिटांचे फेसबुक लाईव्ह केले होते. आजकाल माझी मैत्रीण सिमरन माझे फोनही उचलत नाही, यामुळे मी खूप अस्वस्थ झालो आहे, कोणीतरी मला सांगितले की ती पाटणा शहरातील गुरुद्वाराला पोहोचली आहे, खूप आशेने, मी पाटणा साहिबला तिची एक झलक पाहण्यासाठी आलो, पण इथेही पदरी निराशा पडली, असं परमजीतने लाईव्हमध्ये सांगितलं.

आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, मृतदेह ताब्यात घेत त्यांनी नालंदा वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी सांगितले की, कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे. कुटुंबीयांच्या जबाबाच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.

इंदौरमध्ये जिम प्रशिक्षकाचा गळफास

दुसरीकडे, जिम प्रशिक्षकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच मध्य प्रदेशातील इंदौर शहरात कँटोन्मेंट परिसरात उघडकीस आली होती. धाकटा भाऊ क्रिकेट खेळण्यासाठी बोलवायला त्याच्या खोलीत गेला, तेव्हा हा प्रकार समोर आला. माझ्या दोन्ही बहिणींना माझा चेहरा दाखवू नका, तसंच माझ्या प्रेयसीला अंत्यसंस्काराना बोलवू नका. माझी ही अंतिम इच्छा पूर्ण केली नाहीत, तर माझी आत्मा फिरत राहील, असं त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं.

संबंधित बातम्या :

बहिणींना माझं तोंडही दाखवू नका, प्रेयसीला अंत्यसंस्काराला बोलावू नका, सुसाईड नोट लिहित जिम प्रशिक्षकाचा गळफास

सात जणांची नावं, सुसाईड नोट सेफ्टी पिनने गाठोड्याला अडकवली, कोल्हापुरात महिलेची नदीत आत्महत्या

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI