हत्तीच्या नावे कोट्यवधींची संपत्ती दान करणाऱ्या तरुणाची आठ गोळ्या झाडून हत्या

एका मागून एक झाडलेल्या आठ गोळ्यांमुळे त्यांच्या शरीराची अक्षरशः चाळण झाली. स्थानिक नागरिकांनी त्यांना जखमी अवस्थेत त्यांना पाटणा येथील एम्समध्ये नेले. मात्र त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले.

हत्तीच्या नावे कोट्यवधींची संपत्ती दान करणाऱ्या तरुणाची आठ गोळ्या झाडून हत्या
बिहारमध्ये हत्तींचा सरदार अख्तर इमामची हत्या

पाटणा : बिहारमध्ये हत्तींचा सरदार (हाथी वाले मुखिया) या नावाने ओळखले जाणारे आणि कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आपल्या हत्तींच्या नावावर करणाऱ्या अख्तर इमाम (Patna Elephant Man Akhtar Imam) यांची बुधवारी निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येची ही घटना दानापूरच्या फुलवारी शरीफ भागातील जानीपूर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या मुर्गियाचकमध्ये घडली. अख्तर इमाम यांचा गोळ्या झाडून जीव घेण्यात आला.

जमिनीच्या वादातून हत्येचा संशय

अख्तर इमाम यांच्यावर एका मागून एक गोळ्या झाडण्यात आल्या. इमाम यांच्या पोट आणि कपाळावर आठ गोळ्या मारण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. काही वर्षांपूर्वीही इमाम यांच्यावर हल्ला झाला होता. जमिनीशी संबंधित वादातून त्यावेळी हल्ला झाल्याचं समोर आलं होतं. यावेळीही जमिनीच्या कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अख्तर इमाम यांची बिहारमध्ये हत्तींचा सरदार अशी ओळख आहे. त्यांनी जवळपास पाच कोटी रुपयांची संपत्ती आपल्या हत्तींच्या नावे दान केली होती.

नेमकं काय घडलं?

बुधवारी अख्तर आपल्या गजराजांसह काम करत होते. त्यावेळी आलेल्या दोघा आरोपींनी गोळ्यांच्या फैरी झाडल्या. एका मागून एक झाडलेल्या आठ गोळ्यांमुळे त्यांच्या शरीराची अक्षरशः चाळण झाली. स्थानिक नागरिकांनी त्यांना जखमी अवस्थेत त्यांना पाटणा येथील एम्समध्ये नेले. मात्र त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले.

अख्तर इमाम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आळा आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच अधिक माहिती उपलब्ध होण्याची शक्यता आहे. इमाम यांच्या हत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

निर्घृण खुनाने नाशिक हादरले; चाकूचे 25 वार करून महिलेचा घेतला जीव

50 महिलांचे अश्लील व्हिडीओ, चष्मा ते चार्जर, स्पाय कॅममधून शूटिंग, कसा सापडला जाळ्यात?

पत्नीच्या प्रियकराची हत्या, मृतदेह हातभट्टीत जाळून राख शेळीसोबत पुरली, पिंपरीत ‘दृश्यम’ स्टाईल खून

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI