AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजीच्या हातगाडीचा दुचाकीला धक्का लागला, दुचाकीस्वरांकडून 15 वर्षीय मुलाची हत्या

भाजीच्या हातगाडीचा दुचाकीला धक्का लागल्याने दुचाकीस्वरांनी 15 वर्षीय मुलाची हत्या केलीय.

भाजीच्या हातगाडीचा दुचाकीला धक्का लागला, दुचाकीस्वरांकडून 15 वर्षीय मुलाची हत्या
| Updated on: Dec 22, 2020 | 11:28 AM
Share

नवी दिल्ली :  पोटाची खळगी भरण्यासाठी लहान वयातच भाजी विकून कुटुंबाला तो हातभार लावायचा… सकाळी लवकर उठून आईसोबत तो भाजी घेऊन जायचा…आलेल्या पैशातून कुटुंबाची गुजराण व्हायची.. पण तो आता कायमचा निघून गेलाय… त्याची हत्या झालीये… आणि ही हत्या केलीय समाजातल्या माजलेल्या प्रवृत्तींनी… भाजीच्या हातगाड्याचा आपल्या दुचाकीला धक्का लागला म्हणून दोन दुचाकीस्वरांनी 15 वर्षीय मुलाची हत्या केलीय. दिल्लीतील नोयडामध्ये ही हृदय हेलावून टाकणारी घटना घडलीय. (Bike Riders beat 15 year old Boys Death in noida Delhi)

सविस्तर घटना अशी, नेहमीप्रमाणे रोहित भाजी विकण्यासाठी शहरात पोहोचला. यावेळी भाजी खरेदी करण्यासाठी दोन दुचाकीस्वार त्याच्याजवळ आले. बुलंदशहरवरुन ललित तर बिजनोरवरुन आशिष भाजी खरेदी करण्यासाठी रोहितच्या भाजीच्या गाड्यावर थांबले. याचदरम्यान रोहितच्या हातगाडीचा धक्का दुचाकीला लागला. यावेळी दुचाकी खाली पडली. आपल्या गाडीला धक्का लागला आणि आपली गाडी खाली पडली याचा राग मनात धरुन दुचाकीस्वरांनी रोहितला मारायला सुरुवात केली. लाठ्या-काठ्यांनी रोहितच्या डोक्याला त्यांनी एवढी इजा केली की इस्पितळात दाखल केल्यानंतर अगदी काही वेळात रोहितने प्राण सोडले.

घटनास्थळी बाकीचेही भाजी विक्रेते तिथे होते. त्यांनी आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला, पोलिसांचीही भीती दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपींनी भाजी विक्रेत्यांच्या भीतीला न जुमानता कोवळ्या जीवाची हत्या केली. हत्येनंतर त्यांनी तिथून पळ काढला.

दरम्यान, रोहितच्या हत्येच्या आरोपावरुन दिल्ली पोलिसांनी ग्रेट नोयडा परिसरातून दोन आरोपींना अटक केली आहे. दोन्ही आरोपींच्या विरोधात आयपीसी कलम 304 (हत्येसाठी दोषी) , 323 (मारहाण करणे), 504 (जाणूनबुजून अपमान करणे) अशी कलमे लावली आहेत.

Bike Riders beat 15 year old Boys Death in noida Delhi)

संबंधित बातम्या

धक्कादायक ! पोलिसाकडूनच घटस्फोटीत महिलेवर अत्याचार, नंतर इच्छेविरुद्ध गर्भपात

अयोध्येत रक्तपात, मुलीला सासरी पाठवण्यास वडिलाचा नकार, जावयाकडून तलवारीने सहा जणांवर वार

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.