“तेरे बाप का राज है क्या?” भाजपच्या 75 वर्षीय नगरसेवकाला मारहाण, चौघे अल्पवयीन ताब्यात

भाजप नगरसेवक रोहिदास शंकर पाटील यांना मारहाण झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती. (BJP Corporator Rohidas Patil beaten)

"तेरे बाप का राज है क्या?" भाजपच्या 75 वर्षीय नगरसेवकाला मारहाण, चौघे अल्पवयीन ताब्यात
भाजप नगरसेवक रोहिदास पाटील

मीरा भाईंदर : भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील यांना मारहाण केल्याप्रकरणी चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. मीरा भाईंदर परिसरात स्कूटी वेगात चालवल्यावरुन हटकल्याने चौघा अल्पवयीन तरुणांनी रोहिदास पाटलांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघा आरोपींना ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवलं. (BJP Mira Bhainder Corporator Rohidas Patil beaten by four minor youth)

“तेरे बाप का राज है क्या?”

75 वर्षीय नगरसेवक रोहिदास शंकर पाटील यांना मारहाण झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती. वेगाने स्कूटी चालवल्याचा आक्षेप घेतल्यामुळे “तेरे बाप का राज है क्या, तू हमे बोलनेवाला कौन है?” असा प्रश्न विचारत चौघांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप रोहिदास पाटील यांनी केला आहे. या प्रकरणातील चार अल्पवयीन तरुणांना नवघर पोलिसांनी ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवलं.

रोहिदास पाटील हे पत्नी, सून, नातू, नात अशा परिवारासोबत राहतात. भाईंदर पूर्व येथील जेसल पार्क परिसरात भाजप नगरसेवक रोहिदास पाटील यांचा बंगला आहे. या बंगल्याच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी करण्याच्या निमित्त पाटील तिथे आले होते.

वेगवान स्कूटीचालकांना हटकल्यावरुन वाद

रोहिदास पाटील गेटवर उभे असताना तीन मुलं लाल रंगाची स्कूटीवर भरधाव वेगाने वाकडी-तिकडी चालवत असल्याचं त्यांना दिसलं. त्यामुळे पाटलांनी त्यांना हटकून वेगाने गाडी न चालवण्यास सांगितलं. त्यावेळी चिडलेल्या एका तरुणाने “तेरे बाप का राज है क्या, तू हमे बोलनेवाला कौन हे, तू तेरा देख, मै मेरा देखता हू” अशा शब्दात उत्तर दिल्याचं रोहिदास पाटील यांनी तक्रारीत सांगितलं आहे. (BJP Mira Bhainder Corporator Rohidas Patil beaten by four minor youth)

चौघांची लाथाबुक्क्यांनी मारहाण, नाकाचं हाड फ्रॅक्चर

त्यानंतर आणखी दोन तरुण या ठिकाणी जमा झाले आणि आपल्याला धक्काबुक्की केली. अखेर चौघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन पोबारा केला. माझ्या नाकातोंडातून रक्तस्राव झाला. त्यामुळे शेजाऱ्यांनी रुग्णालयात नेऊन आपल्यावर उपचार केले, असा दावाही रोहिदास पाटील यांनी केला आहे. नाकाचं हाड फ्रॅक्चर झाल्याचं पाटलांनी तक्रारीत नमूद केलं आहे.

संबंधित बातम्या :

पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला टोळक्याची बेदम मारहाण

“ओळखलं नाही का? मी नगरसेवकाचा भाऊ” दागिने-पैसे लुटणारा वसईचा भामटा अटकेत

(BJP Mira Bhainder Corporator Rohidas Patil beaten by four minor youth)

Published On - 7:49 am, Wed, 10 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI