देह व्यापारात बॉलीवूडच्या महिला कास्ट डायरेक्टरला अटक, ताब्यातून दोन मॉडेलची सुटका
मुंबई पोलीसांच्या समाजसेवा शाखेने ही धडक कारवाई केली आहे. पुरावा म्हणून संपूर्ण ऑपरेशन रेकॉर्ड करण्यात आले आहे.

मुंबई : बॉलीवूडच्या चमचमत्या दुनियेमागचे कटू वास्तव पुन्हा एकदा उघड झाले आहे. बॉलीवूडच्या एका महिला कास्टींग डायेक्टरला जुहू आणि गोरेगावातील पॉश हॉटेलातून देह व्यापार करताना अटक केली आहे. या कास्टींग डायरेक्टरचे बिंग उघड करण्यासाठी मुंबई पोलीसांच्या समाजसेवा शाखेने पोलिसांनाच नकली ग्राहक बनून पाठविले होते. अखेर ठरलेल्या ठिकाणी एका हॉटेलात या महिला कास्ट डायेक्टरला रंगेहात अटक झाली असून तिच्या ताब्यातून दोन मॉडेलची सुटका करण्यात आली आहे.
मुंबईच्या दिंडोशी पोलिसांनी कास्टींग डायरेक्टर आरती मित्तल हीला अटक केली आहे. आरतीवर देह व्यापार म्हणजेच सेक्स रॅकेट चालविण्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरतीला रंगेहात पकडले असून तिच्या तावडीतून दोन मॉडेलची सुटका केली आहे. पोलिसांनी एक योजना आखत सापळा रचला होता. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने दोन नकली ग्राहकांना पाठविले आणि त्या दोन मॉडेलना वाचविले आहे. त्यापैकी एका मॉडेलला पुनर्वसन केंद्रात पाठविण्यात आले आहे. तर एकीची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी हे संपूर्ण ऑपरेशन एका कॅमेऱ्यात रेकॉर्ड केले आहे. आरती हिच्यावर अनेक कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुंबई पोलीसांच्या समाजसेवा शाखेने ही धडक कारवाई केली आहे. पुरावा म्हणून संपूर्ण ऑपरेशन रेकॉर्ड करण्यात आले आहे. आरोपी आरती हरिश्चंद्र मित्तल चित्रपटासाठी कास्टींग डायरेक्टर म्हणून काम करते. ती ओशिवरा येथील आराधना अपार्टटेंड येथे रहाते असे वृत्त मिड-डे या वृत्तपत्राने दिले आहे. आरती मित्तल अशा मॉडेलना आपल्या जाळ्यात ओढायची ज्या वेगवेगळ्या अभिनयाच्या ऑफरसाठी तिच्या संपर्कात यायच्या आणि ज्यांना पैशांची खूप गरज आहे. ती त्यांना देहव्यापारासाठी चांगले पैसे मिळवून देण्याच्या ऑफर द्यायची. पोलिस इन्सपेक्टर मनोज सूतार यांना या सेक्स रॅकेटची खबर लागताच त्यांनी दोन पोलिसांनाच तिच्याकडे ग्राहक बनवून पाठविले.
60 हजार रूपयांची मागणी
पोलीसांनी या ऑपरेशनसाठी एक टीम स्थापन केली. पोलिसांना नकली ग्राहक बनवून तिच्याकडे दोन मुली पुरविण्यासाठी ऑपर दिली. यासाठी आरती हीने पोलिसांकडून 60 हजार रूपयांची मागणी केली. इन्सपेक्टर मनोज सुतार यांच्या मोबाईल फोनवर आरतीने संबंधित दोन मॉडेलची छायाचित्र पाठविले.
