AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑनलाईन गेमसाठी पैसे न दिल्याने सावत्र आईची हत्या केली,वर फरशीवर पडल्याचा बनाव केला, पोलिसांनी गुढ उकलले

या तरुणाला गेम खेळण्यासाठी त्याला एक लाख 80 हजाराची गरज होती. आणि ते पैसे मागण्यासाठी तो त्याच्या सावत्र आईकडे गेला असता तिने त्याला पैसे दिले नाहीत यातून त्यांचे वाद झाले आणि तिची हत्या झाली.

ऑनलाईन गेमसाठी पैसे न दिल्याने सावत्र आईची हत्या केली,वर फरशीवर पडल्याचा बनाव केला, पोलिसांनी गुढ उकलले
| Updated on: Jul 28, 2025 | 10:39 PM
Share

ऑनलाईन गेमच्या व्यसनाने अनेक जण कर्जबाजारी होऊन त्यांचे संसार उद्धवस्त होत आहेत. परंतू आता ऑनलाईन गेमसाठी पैसे न दिल्याने एकाने तरुणाने सावत्र आईची निर्घृणपणे हत्या केल्याचे उघड झाले आहे. तसेच हा गुन्हा लपवण्यासाठी आपल्या वडील आणि चुलत्याच्या मदतीने आईचा फरशीवर घसरुन मृत्यू झाल्याचा बनाव रचला होता. मात्र, पोलिसांनी तो हाणून पाडला आहे. वसई गुन्हे शाखा 2च्या मदतीने 24 तासात या गुन्ह्याची उकल करुन चौघांना बेड्या घालण्यात आल्या.

इम्रान खुसरु याला व्हीआरपीओ हा ऑनलाईन गेम खेळायचा. त्याला टेलिग्रामवरून या गेमचा मॅसेज आला होता. तो गेम खेळण्यासाठी त्याला एक लाख 80 हजाराची गरज होती. आणि ते पैसे मागण्यासाठी त्याच्या सावत्र आईकडे गेला असता त्याला तिने दिले नाही. त्यामुळे त्याने तिची रागाच्या भरात निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर हा गुन्हा लपवण्यासाठी बाप अमिर खुसरु, चुलता सलीम खुसरु यांच्या मदतीने त्याची आई फरशीवर पडून जखमी झाल्याने त्यातच तिचा मृत्यू झाल्याचा बनवा केला. त्यासाठी त्याने डॉक्टर करून मृत्यूप्रमाणपत्र घेऊन तिचा मृतदेह मुस्लिम दफनभूमीत पुरून अंत्यविधी उरकला होता.

आई पेशाने वकील

वसई गुन्हेशाखा – 2 च्या टीम ने 24 तासात या हत्येचा भांडाफोड करून चारही आरोपीना बेड्या टोकल्या आहेत.मुलगा इम्रान खुसरु, बाप अमिर खुसरु, चुलता सलीम खुसरु, तसेच डॉ. आर. आर. गर्ग असे अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत. तर आर्शिया खुसरू ( वय 61) असे हत्या झालेल्या सावत्र आईचे नाव असून त्याची आई ही पेशाने वकील होती. आणि हायकोर्टात प्रॅक्टीस करीत असल्याची माहिती उघड झाली आहे. ही घटना वसई पश्चिम डिमार्ट जवळील पेरियार अपार्टमेंटमध्ये 26 जुलै रोजी सकाळी सव्वा दहावाजता घडली आहे.

रागाच्या भरात हत्या

आरोपी मुलगा इम्रान हा व्ही. आर. पी. ओ. हा ऑनलाईन गेम खेळायचा. त्याला टेलिग्राम वरून या गेम चा मॅसेज आला होता. तो गेम खेळण्यासाठी त्याला एक लाख 80 हजाराची गरज होती. आणि ते पैसे मागण्यासाठी गेला असता त्याला दिले नाहीत, म्हणून त्याने रागाच्या भरात ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, पोलीस याचा तपास करीत आहेत.

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.