वहिनीसाठी दिराने आणले आयस्क्रीम, म्हणाला प्लीज खा.. भावाला राग आला अन् नंतर जे घडलं… पोलिसही हादरले
एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. नव्या वहिनीसाठी दिराने आयस्क्रीम आणले होते. ते पाहून भावाने जे काही केलं त्यावर विश्वासच बसणार नाही.

नवी नवरी जेव्हा घरी येते, तेव्हा संपूर्ण कुटुंब आनंदाने तिचे स्वागत करते. घरातील वातावरण उत्साही आणि आनंदी असते. पण बिहारच्या छपरा येथे नव्या लग्नाच्या आनंदावर विरझण पडले आहे. येथे तीन भावांपैकी सर्वात मोठ्या भावाचे लग्न झाले. नवी वहिनी घरी आली, तेव्हा सर्वात लहान 17 वर्षीय दिराने घरच्यांसाठी आइस्क्रीम आणले. त्याने प्रेमाने वहिनीला आइस्क्रीम दिले आणि म्हणाला, “खा ना, प्लिज.” हे पाहून मोठा भाऊ रागाने उठला. नंतर त्याने जे केले ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला.
आइस्क्रीममुळे भांडण
छपराच्या परसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माड़र गावात रविवारच्या संध्याकाळी ही हृदयद्रावक घटना घडली. नव्या वहिनीला आइस्क्रीम देणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. कथितरित्या, आइस्क्रीम दिल्याने नाराज झालेल्या मोठ्या भावाने आपल्या लहान भावाची चाकूने भोसकून हत्या केली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. लोक म्हणत आहेत, एवढ्या छोट्या गोष्टीवर भाऊ आपल्या भावाची हत्या करू शकतो का? एका आइस्क्रीममुळे सुरू झालेले किरकोळ भांडण इतके हिंसक रूप घेईल, याची कोणाला कल्पना नव्हती.
सख्ख्या भावावरही दया नाही
मृतक 17 वर्षीय सोनू कुमार हा दीना साह यांचा तिसरा मुलगा होता. मिळालेल्या माहितीनुसार, 10 जून रोजी सोनूचा मोठा भाऊ शनी कुमारचे लग्न झाले होते. रविवारी सोनू तीन आइस्क्रीम घेऊन घरी आला. त्याने एक स्वत: खाल्ली, एक आईला दिली आणि तिसरी आइस्क्रीम मोठ्या भावाला, शनीला देऊ केली. शनीने आइस्क्रीम घेण्यास नकार दिला. तेव्हा आईने सुचवले की ती आइस्क्रीम नवविवाहित वहिनीला दे. याच गोष्टीवरून दोघा भावांमध्ये वाद सुरू झाला, जो काही क्षणातच हिंसक बनला. रागाच्या भरात शनीने चाकूने सोनूवर सलग वार केले.
आई-वडिलांचा आक्रोश
रक्तबंबाळ झालेल्या सोनूला कुटुंबीयांनी तातडीने सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले, पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना समजताच गावात सनसनी पसरली. मृतकाचे वडील दीना साह, आई सुगिया देवी आणि भाऊ-बहीण यांना अश्रू अनावर झाले. परसा पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी सुनील कुमार यांनी सांगितले की, पोलिस या प्रकरणाचा गंभीरपणे तपास करत असून, आरोपीच्या अटकेसाठी छापेमारी सुरू आहे. कुटुंबातील आनंदाचे वातावरण आता मातमात बदलले आहे.
