लग्नानंतर पतीला दिलं दूध, बेशुद्ध झाल्यावर नववधूने जे कांड केलं…
लग्नानंतर सगळं छान होतं, नववधू बनलेली वंदना पीडित पुष्पकांत याच्या घरी आली. दोन दिवस सर्व काही ठीक होते, पण त्यानंतर जे घडले त्यामुळे पुष्पकांतच्या कुटुंबाला मोठा धक्काच बसला.

राजस्थानमधील अबुरोड येथील रीको पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी लुटेरी दुल्हन या टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी प्रथम एखाद्या व्यक्तीला आपला बळी बनवायची आणि नंतर त्याचे लग्न स्वतःच्या टोळीतील महिलेशी लावून द्यायची. पण लग्नानंतर एक-दोन दिवसांनी ती महिला कुटुंबातील सदस्यांच्या जेवणात आणि दुधात मादक पदार्थ मिसळायची, ज्यामुळे कुटुंबातील सदस्य बेशुद्ध व्हायचे. यानंतर, ती महिला घरात असलेल्या मौल्यवान वस्तू लुटून फरार व्हायची.
पोलिसांनी दिलेल्या माहिताीनुसार, 14 एप्रिल रोजी देखील अशीच घटना घडल्याचे उघडकीस आले. संतपूर येथील पुष्पकांत उपाध्याय नावाच्या मुलाला आणि त्याच्या कुटुंबाला लग्नाच्या नावाखाली शिवगंज येथे बोलावण्यात आले. जिथे वंदना पटेल, अन्वर, शांती आणि इतर लोकं त्याला भेटले. यानंतर त्यांनी अडीच लाख रुपये घेऊन पुष्पकांतचे लग्न उत्तर प्रदेशातील रहिवासी वंदना पटेलशी एका मंदिरात लावून दिलं.
जेवणात मिसळलं नशेचं औषध
लग्नानंतर सगळं छान होतं, नववधू बनलेली वंदना पीडित पुष्पकांत याच्या घरी आली. दोन दिवस सर्व काही ठीक होते, पण त्यानंतर जे घडले त्यामुळे पुष्पकांतच्या कुटुंबाला मोठा धक्काच बसला. खरं तर, तिसऱ्या दिवशी, 17 एप्रिलच्या रात्री, वंदनाने अन्न आणि दुधात मादक पदार्थ मिसळले आणि ते वराला आणि त्याच्या आईला खायला दिले, ते खाऊन दोघेही बेशुद्ध पडले. त्यानंतर संधी मिळताच वंदना पटेलने घरातील सर्व मौल्यवान वस्तू, पैसे, आणि बाकीचा ऐवज लुटला आणि पळून गेली. बेशुद्ध झालेला नवरा मुलगा आणि त्याची आई या दोघांवर पालनपूर रुग्णालयात उपचार करण्यात आले.
इतर गुन्ह्यांचीही शंका
यानंतर पीडित इसम पुष्पकांत याने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणातील चौकशीनंतर उत्तर प्रदेशातील रहिवासी अन्वर फकीर, शांती देवी सेन आणि वंदना पटेल यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस त्यांची चौकशी करत आहेत. हे सर्व आरोपी गुन्ह्यांच्या इतर घटनांमध्येही सामील असू शकतात अशी शंका व्यक्त होत आहे.
