AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भगवान बुद्धांना प्रसन्न करण्यासाठी अघोरी प्रकार, बौद्ध भिख्खूने स्वतःचंच डोकं तलवारीने उडवलं

थम्मकॉर्न वांगप्रे गेल्या पाच वर्षांहून अधिक काळापासून अघोरी प्रकार करण्याचा बेत आखत होते. (Buddhist Monk cut off Head)

भगवान बुद्धांना प्रसन्न करण्यासाठी अघोरी प्रकार, बौद्ध भिख्खूने स्वतःचंच डोकं तलवारीने उडवलं
बौद्ध भिख्खू - प्रातिनिधीक फोटो
| Updated on: Apr 22, 2021 | 12:50 PM
Share

बँकॉक : भगवान गौतम बुद्ध यांना (Gautam  Buddha) प्रसन्न करण्यासाठी बौद्ध भिख्खूने (Buddhist monk) तलवारीने (guillotine) स्वतःचाच शिरच्छेद केला. मृत्यूपश्चात जीवनामध्ये पुण्य कमवण्याच्या आसक्तीतून भिख्खूने टोकाचं पाऊल उचललं. थायलंडमध्ये 68 वर्षीय थम्मकॉर्न वांगप्रे (Thammakorn Wangpreecha) यांनी तलवारीने स्वतःचेच डोके उडवले. (Buddhist Monk cut off own Head with Guillotine to get Good Luck in Afterlife in Thailand)

थम्मकॉर्न वांगप्रे गेल्या पाच वर्षांहून अधिक काळापासून अघोरी प्रकार करण्याचा बेत आखत होते. गेल्या गुरुवारी 15 एप्रिल रोजी नोंग बुआ लम्फु प्रांतातील वट फू हिन मंदिरात ते मृतावस्थेत आढळले. त्यावेळी त्यांचे शिर पार्थिवाशेजारी पडलेले आढळले.

पुतण्याला सापडला शिरच्छेद अवस्थेतील मृतदेह

वांगप्रे यांचा मृतदेह पुतण्या बुंचर्ड बूनरोड यांना सापडला. काकांच्या योजना लिहिलेली एक संगमरवरी लादीही त्यांना सापडली. बूनरोड म्हणाले की “माझ्या काकांनी एका पत्रात म्हटले आहे, मस्तक अर्पण करणे ही भगवान गौतम बुद्धांची स्तुती करण्याचा एक मार्ग आहे. ते पाच वर्षांपासून ही विचित्र परंपरा प्रत्यक्षात उतरवण्याची योजना आखत होते. काकांची इच्छा होती की त्यांनी आपले मस्तक आणि आपला आत्मा अर्पण करावा, जेणेकरून बुद्ध आपल्या उच्च अध्यात्मिक व्यक्ती म्हणून पुनर्जन्म घेण्यास मदत करू शकतील.” असंही बुनरोड म्हणाले.

बौद्ध देवताच्या पुतळ्याशेजारी असलेली तलवार (गिलोटिन) त्यांनी वापरली. शरीरापासून विभक्त झालेले मस्तक भगवान बुद्ध पुन्हा जागेवर ठेवेल, या भाबड्या आशेतून त्यांनी हे कृत्य केले. या भिक्षूने 11 वर्षे मंदिराची सेवा केली होती. यापूर्वी त्यांनी इतर पुजार्‍यांना भिक्षुकी सोडण्याबाबत कळवले होते, परंतु शिरच्छेदाविषयी उल्लेख केला नव्हता.

अंत्यसंस्कारासाठी स्थानिकांची गर्दी

भिख्खूच्या निधनानंतर पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदन तपासणी आणि मृत्यूचे कारण नोंदवण्यासाठी मंदिरातून रुग्णालयात नेला. पार्थिव अधिकाऱ्यांना परत केल्यानंतर 300 पेक्षा जास्त स्थानिक रहिवासी अंतिम संस्कार करण्यासाठी मंदिरात दाखल झाले होते.

संबंधित बातम्या :

अंबरनाथ लोकलमध्ये धड नसलेलं शिर, लगेजच्या डब्यात रात्री एक वाजता घटना उघड

(Buddhist Monk cut off own Head with Guillotine to get Good Luck in Afterlife in Thailand)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.