Car Accident : रात्री लग्नाच्या मंडपात घुसली कार, इकडं तिकडं पळालेले वाचले, बाकीचे…

महेश घोलप, Tv9 मराठी

|

Updated on: Feb 09, 2023 | 2:11 PM

मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तर जखमी तिथल्या जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Car Accident : रात्री लग्नाच्या मंडपात घुसली कार, इकडं तिकडं पळालेले वाचले, बाकीचे...
Image Credit source: Google

मेरठ : भरधाव वेगाने (Speed car) निघालेली कार अचानक लग्नाच्या मंडपात (The wedding pavilion) घुसली. मंडप मोडला, समोर असलेल्या काही लोकांना उडवलं. त्यापैकी तीन लोकांचा मृत्यू झाला. तर काहीजण जखमी झाले, बुधवारी रात्री युपीच्या मेरठमधील (UP Merath) बफर गावात ही घटना घडली आहे. नवरदेवाच्या चुलत भावासह दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अपघातामध्ये बारा जण जखमी झाले असल्याची माहिती एक बेवसाईटने दिली आहे.

मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तर जखमी तिथल्या जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

लग्नात आलेल्या काही पैपाहुण्यांनी अपघातनंतर चालकाला बेदम मारहाण केली आहे. त्याचबरोबर त्याची कार देखील पेटवून देण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मेरठच्या एक तरुणाचा तिथल्याचं जवळच्या गावातील एका तरुणीशी रस्त्याच्या बाजूला असलेल्या हॉलमध्ये विवाह सोहळा सुरु होता. त्यावेळी भरधाव वेगाने आलेली कार थेट लग्नात घुसली. त्यावेळी हॉलच्या बाहेरच्या बाजूला नाचत असलेल्या लोकांचा मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

कार चालकाच्या चुकीमुळे हा अपघात घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI