AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सचिन वाझेंच्या वसुलीचे रेटकार्ड लिहिलेली डायरी सीबीआयच्या ताब्यात

अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींची वसूली करण्याचे आदेश दिल्याच्या आरोपांचा सीबीआय प्राथमिक तपास करत आहे. (CBI Sachin Vaze Diary )

सचिन वाझेंच्या वसुलीचे रेटकार्ड लिहिलेली डायरी सीबीआयच्या ताब्यात
सचिन वाझे
| Updated on: Apr 12, 2021 | 3:59 PM
Share

मुंबई : निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या केबिनमधून सापडलेली डायरी सीबीआयने ताब्यात घेतली आहे. या डायरीमध्ये त्यांच्या सर्व वसुलीचे रेटकार्ड सापडले आहेत. किती जणांकडून किती देणीघेणी बाकी आहेत, याची नोंद डायरीत असल्याची माहिती आहे. डायरीतून अनेक आर्थिक व्यवहार उघडकीस येण्याची शक्यता आहे. (CBI to probe Sachin Vaze Diary in 100 crore allegations on Anil Deshmukh)

एनआयएला सचिन वझे यांच्या निकटवर्तीय मीना जॉर्ज यांच्या घरातूनही डायरी सापडली होती. सीबीआयने ती डायरीही ताब्यात घेतली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींची वसूली करण्याचे आदेश दिल्याच्या आरोपांचा सीबीआय प्राथमिक तपास करत आहे.

अनिल देशमुखांचीही चौकशी याच आठवड्यात

सीबीआयच्या सूत्रांच्या माहितीप्रमाणे या आठवड्यातच अनिल देशमुख यांना सीबीआय चौकशीसाठी बोलवण्याची शक्यता आहे. सीबीआयला प्राथमिक तपासणीसाठी दोन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला होता. काल सीबीआय अधिकारी सचिन वाझेंच्या दोन वाहन चालकांना डीआरडीओमध्ये स्वतः घेऊन आले होते. तर पीए कुंदन आणि पलांडे यांना समन्स पाठवून बोलावले गेले होते. या सर्वांची 8 ते 10 तास चौकशी केली गेली. यापूर्वी सचिन वाझे, बार मालक महेश शेट्टी, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, फिर्यादी जयश्री पाटील यांचे जबाब आधीच नोंदवले गेले आहेत.

एनआयएकडून सीबीआयची मागणी मान्य

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) सचिन वाझे आणि विनायक शिंदे यांची डायरी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. यामध्ये सचिन वाझे खंडणी गोळा करत असलेल्या मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटसचा तपशील आहे. ही डायरी तपासासाठी आपल्याला मिळावी, अशी मागणी सीबीआयने NIA कोर्टात केली होती.

काय आहे डायरीत

सचिन वाझेंच्या ऑफिसची झाडाझडती घेताना एनआयएच्या हाती सचिन वाझेंची डायरी लागली होती. कोणत्या दिवशी कोणाला भेटायचंय, याचीही तारीख डायरीत नमूद करण्यात आली आहे. पब्ज, बार, बुकी आणि इतर महत्त्वाच्या कारवायांचा उल्लेख आहे.

हफ्त्याची गुपितं उघडकीस येणार

सचिन वाझेंच्या डायरीतून हफ्त्याची गुपितं उघडकीस येण्याची शक्यता आहे. कुणाला किती पैसे जात होते, याचा हिशेब सचिन वाझे ठेवत होते. डायरीत मुंबईतील सर्व बार, पब आणि हुक्का पार्लरची यादी आहे. ज्यांनी पैसे दिले त्याबाबत कोड भाषेत नोंद आहे. (CBI to probe Sachin Vaze Diary in 100 crore allegations on Anil Deshmukh)

कोड भाषेत नोंद

लाखाच्या नोंदीसाठी L, तर हजाराच्या नोंदीसाठी K हे अक्षर वापरले आहे. बार, पब, हुक्का पार्लर यांची येणारी रक्कम आणि दिलेली रक्कमही लिहिली आहे. पैशाचं वाटप नियमित होत होतं. त्याबाबतही कोड भाषेत नोंद आहे. व्यक्तीऐवजी विभाग लिहिण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

‘ते’ पत्र मीडियात लीक कसं झालं, NIA चा आक्षेप; न्यायाधीशांचा सचिन वाझेंच्या वकिलांना सवाल

सचिन वाझेंची 200 पानी डायरी NIA च्या हाती, कोड लँग्वेजमधील हिशोब उघडकीस?

(CBI to probe Sachin Vaze Diary in 100 crore allegations on Anil Deshmukh)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.