AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Vaze: ‘ते’ पत्र मीडियात लीक कसं झालं, NIA चा आक्षेप; न्यायाधीशांचा सचिन वाझेंच्या वकिलांना सवाल

असा प्रकार पुन्हा होता कामा नये, अशी ताकीद न्यायाधीशांनी दिल्याचे समजते. | NIA Sachin Vaze letter

Sachin Vaze: 'ते' पत्र मीडियात लीक कसं झालं, NIA चा आक्षेप; न्यायाधीशांचा सचिन वाझेंच्या वकिलांना सवाल
सचिन वाझे
| Updated on: Apr 09, 2021 | 3:53 PM
Share

मुंबई: अंबानी स्फोटक प्रकरण आणि हिरेन मनसुख हत्याप्रकरणाचा मुख्य सूत्रधार सचिन वाझे (Sachin Vaze) यांची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयाने वाझे यांना 23 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या सुनावणीवेळी अनेक रंजक गोष्टी समोर आल्या. (Sachin Vaze letter leaked into media NIA take objection)

सचिन वाझे यांनी नुकतेच एक पत्र लिहून शिवसेनेचे मंत्री अनिल परब आणि अन्य नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. हे पत्र सचिन वाझे यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) दिल्याची चर्चा होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी NIA कडून कोर्टात वेगळाच दावा करण्यात आला.

सचिन वाझे यांचे हे पत्र प्रसारमाध्यमांपर्यंत कसे पोहोचले, असा सवाल विचार NIA ने आक्षेप नोंदवला. सचिन वाझे हे आमच्या कस्टडीत होते. इतर तपास यंत्रणांना या पत्राची माहिती नव्हती. मग तरीदेखील हे पत्र मीडियात कसे लीक झाले, असा सवाल NIAच्या वकिलांकडून उपस्थित करण्यात आला. त्यावर न्यायाधीशांनी सचिन वाझे यांचे वकील आबाद पोंडा यांना विचारणा केली. तेव्हा त्यांनी आपल्याला याविषयी कोणतीही माहिती नसल्याचे म्हटले. त्यावर असा प्रकार पुन्हा होता कामा नये, अशी ताकीद न्यायाधीशांनी दिल्याचे समजते.

सचिन वाझेंना न्यायालयीन कोठडी; सुरक्षित सेलची केली मागणी

सचिन वाझे यांची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी आपल्याला सुरक्षित सेल मिळावी, अशी मागणी केल्याचे समजते. तसेच सचिन वाझे यांची प्रकृती आता ठीक असून त्यांना इतक्यात कोणत्याही उपचारांची गरज नसल्याचे NIA ने स्पष्ट केले.

NIA सीबीआयला सचिन वाझेंची डायरी देणार

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) सचिन वाझे आणि विनायक शिंदे यांची डायरी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. यामध्ये सचिन वाझे खंडणी गोळा करत असलेल्या मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटसचा तपशील आहे. ही डायरी तपासासाठी आपल्याला मिळावी, अशी मागणी सीबीआयने NIA कोर्टात केली होती. विशेष कोर्टाने ही मागणी मान्य केली आहे.

ठाकरे सरकारचा RTO परिवहन मंत्रालयाचा बदल्यांमध्ये घोटाळा: सोमय्या

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता ठाकरे सरकारवर आणखी एक आरोप केला आहे. ठाकरे सरकारने परिवहन मंत्रालयाचा बदल्यांमध्ये घोटाळा केल्याचे त्यांनी म्हटले आहे. दोन-दोन महिन्यांच्या कालावधीत अनेकांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यासाठी 25 लाखांपासून 1 कोटी इतक्या रक्कमेची वसुली करण्यात आली. एका प्रकरणात तर 30 जूनला कर्मचारी रिटायर होणार असताना 29 जूनला त्याची बदली करण्यात आली.

त्यामुळे मंत्री अनिल परब यांचा परिवहन मंत्रालयाच्या बदल्यांची चौकशी झाली पाहिजे. मी CBI पासून राज्यपालांपर्यंत या बदल्यांची माहिती पाठवली आहे. अनिल परब साहेब हिशोब तर द्यावाच लागणार, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.

संबंधित बातम्या :

EXCLUSIVE : अनिल देशमुखांनी 2 कोटी मागितले, सचिन वाझेंचा लेटरबॉम्ब, मविआच्या 3 मंत्र्यांवर गंभीर आरोप

(Sachin Vaze letter leaked into media NIA take objection)

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.