Chandrapur Crime : ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची कोट्यवधींची फसवणूक, बुकिंग एजन्सीच्या दोन भावांवर गुन्हा दाखल

प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे चंद्रपूरमध्ये एकच खळबळ माजली आहे.

Chandrapur Crime : ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची कोट्यवधींची फसवणूक, बुकिंग एजन्सीच्या दोन भावांवर गुन्हा दाखल
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची करोडोची फसवणूकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 19, 2023 | 3:50 PM

चंद्रपूर / 19 ऑगस्ट 2023 : चंद्रपूरमधील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची करोडोची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. सफारी बुकिंग करणाऱ्या एजन्सीच्या 3 वर्षाच्या लेखा अहवालानंतर ताडोबा व्यवस्थापनाने तक्रार नोंदविली. बुकिंग एजन्सीच्या 2 संचालक भावांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर अशी गुन्हा दाखल झालेल्या संचालकांची नावे आहेत. ठाकूर बंधूंनी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची सुमारे 12 कोटींची फसवणूक केली आहे. या कारवाईमुळे चंद्रपूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये येण्यासाठी ऑनलाईन तिकिट बुकिंग एजन्सी म्हणून चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हिटी सोल्युशनकडे जबाबदारी होती. करारानुसार, गेल्या 3 वर्षात एकूण 22 कोटी 80 लाख 67 हजार देय रकमेपैकी केवळ 10 कोटी 65 लाखांचा भरणा या एजन्सीने केला. बाकी रक्कम देण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही उर्वरित रक्कम मिळालेली नाही.

या एजन्सीने सुमारे 12 कोटी 15 लाख 50 हजार रुपयांची व्यवस्थापनाची फसवणूक केली आहे. चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला फसविल्याप्रकरणी बुकिंग एजन्सी विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान आणि एजन्सी यांच्यात झालेल्या कराराच्या अटी-शर्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी अखेर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले. विभागीय वनाधिकारी सचिन शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?.
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार.
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव.
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा.
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड.
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम.
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत.
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा.
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले...
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले....
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले...
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले....